‘पेड न्यूज’चे नवे रूप जगासमोर, लेख छापा अन् 20000 रूपये घ्या ! राज्य सरकारनं चक्‍क ‘टेंडर’च काढलं

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – नेते निवडणुकीत प्रचारासाठी थेट मिडियाशी देवाण घेवाण करुन आपल्या बातम्या छापून आणत होते. आता राज्य सरकारने थेट पत्रकारांना कौतुकाची बातती छापून आणा आणि २० हजार रुपये घेऊन जा अशी आफर दिली आहे. पेड न्यूजचे हे नवे रुप समोर आले आहे. झारखंडच्या राज्य सरकारने यासाठी चक्क टेंडर काढले आहे.

अनेक नेते पत्रकारांना हाताशी धरुन आपल्या विषयी चांगले छापून आणण्याचा प्रयत्न करतात. निवडणुक काळात तर थेट न्यूज चॅनेल, वृत्तपत्रांचे मालक उमेदवारांशी अलिखित करार करुन लाखो रुपयांना आपल्या चॅनेलवरील वेळ तसेच वृत्तपत्राची जागा विकतात. अमूक इतका वेळ तुमची बातमी दाखविली जाईल किंवा इतक्या कॉलम सेंटीमीटरची तुमची बातमी छापली जाईल असे सांगितले जाते.

पण, झारखंड सरकारने एक टेंडर काढले आहे. त्यात त्यांनी राज्य सरकारच्या योजनांचे कौतुक छापणाऱ्या पत्रकारांकडून अर्ज मागविले आहेत. आलेल्या अर्जातून शासनाची एक समिती ३० जणांची निवड करेल. या ३० जणांना प्रत्येकी १५ हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यांना विषय वाटून दिले जातील. त्यानंतर त्यांनी पुढच्या महिन्याभरात म्हणजे १८ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या किंवा इतर वृत्तपत्रात योजनेची माहिती देणारा लेख छापून आणायचा आहे. या लेखाचे कात्रण सादर केल्यावर किंवा त्याचा व्हिडिओ सादर केल्यावर त्यांना आणखी ५ हजार रुपये देण्यात येणार आहे.

आता ही वृत्तपत्रे व न्यूज चॅनेल जरी पेड न्यूज घेत असले तरी कोणते मोठे वृत्तपत्र उघडपणे आपल्या पत्रकारांना सांगेल की तुम्ही अर्ज करा आणि तुमची बातमी छापतो. जेथे मालक, संपादक, पत्रकार एकच आहेत, अशा छोट्या वृत्तपत्रांना मात्र राज्य शासनाने अधिकृतपणे संधी मिळवून दिली आहे.

Visit – policenama.com 

You might also like