नो-टेन्शन ! ‘आर्थिक मंदी’चा भारतावर परिणाम नाही, जगातील सर्वात मोठ्या ‘रेटिंग’ एजन्सीनं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची कोणतीही शक्यता नाही. मात्र जागतिक अर्थव्यवस्था यातून सुटणे फार अवघड आहे. अमेरिका-चीन व्यापार युद्धाचाही ग्लोबल इकॉनॉमी आणि ट्रेडवर परिणाम होत आहे. ग्लोबल सप्लाय चेनमध्ये भारताचं योगदान खूपच कमी आहे. अमेरिकन रेटिंग एजन्सी जेपी मॉर्गनचे इंडिया इक्विटी रिसर्च हेड यांनी याबाबत माहिती दिली आहे.

जे पी मॉर्गनचे इंडिया इक्विटी रिसर्च हेड राजेश मॅस्करेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘येत्या दोन वर्षांत जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची शक्यता 40 टक्के आहे. म्हणूनच जगभरातील मध्यवर्ती बँका आता व्याजदरात कपात करीत आहेत आणि सरकारी खर्चही वाढत आहे.’

भारताच्या मंदीच्या अडचणीत अडकण्याची शक्यता कमी –

भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये उपभोग हा मोठा घटक आहे, त्याला गुंतवणूकीचे पाठबळ मिळत आहे. पायाभूत सुविधांना व्यापार नव्हे तर भारतीय अर्थव्यवस्थेला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे भारत मंदीच्या झोतात सापडेल असे आम्हाला वाटत नाही. तथापि, जगभरातील मंदी असेल तर त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम होईल, कारण अशा प्रकारे भारताची निर्यात कमी होईल आणि आयात वाढेल. त्यामुळे सरकारच्या खर्चावर परिणाम होईल.

या गोष्टी भारताच्या फेवरमध्ये-

भारतीय मॅक्रो इकनॉमिक डेटा अजूनही मिश्रीत आहे. मॅक्रो अर्थव्यवस्थेत स्थिरता आहे. महागाई नियंत्रणात आहे. यामुळे व्याज दर कमी होण्यास मदत होत आहे. जरी गेल्या तिमाहीत भारताच्या विकासात लक्षणीय घट झाली आहे. तरी केंद्र सरकारचे कौतुक केले पाहिजे कारण त्यांचे आर्थिक शिस्तीवर लक्ष आहे.
आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहामाहित भारतीय अर्थव्यवस्थेत हळूहळू रिकव्हरी सुरु होणार आहे. मीडियम टर्ममध्ये ही रिकव्हरी खूप मजबूत असू शकते.

visit : policenama.com