चिनी वस्तूंची आयात 2900 कोटींवरुन थेट शून्यावर आणणार; ‘या’ भारतीय कंपनीने दिला शब्द

पोलिसनामा ऑनलाईन – चिनी मालावर बहिष्कार टाकण्याच्या मोहीमेमध्ये आता जेएसडब्ल्यू या बड्या कंपनीने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. चिनीमधून होणारी आयात पुढील दोन वर्षांमध्ये पूर्णपणे बंद करण्याचे उद्दीष्ट कंपनीने डोळ्यांसमोर ठेवले आहे. कंपनीच्या सिमेंट आणि पेंट विभागाचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ जिंदाल यांनी यासंदर्भात ट्विटवरुन माहिती दिली आहे.

चीनने भारतीय भूभागावर हल्ला करुन आपल्या शूर जवानांवर हल्ला करुन आम्हाला जागे केले आहे. याच संदर्भात निर्णय घेताना जेएसडब्ल्यू ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी 400 बिलियन डॉलरचा माल आयात होतो. ही आयात आम्ही पुढील 24 महिन्यांमध्ये शून्यावर आणून अशी आम्ही प्रतिज्ञा करतो, असे पार्थ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. म्हणेज जिंदाल ग्रुप दरवर्षी चीनमधून आयात करणार्‍या वस्तूंची किंमत ही अंदाजे 2900 कोटी असून कंपनी टप्प्याटप्प्यात चीनवर अवलंबून राहणे कमी करणार आहे. आत्मनिर्भर होत जिंदल ग्रुप चीनमधून पुढील दोन वर्षात आयात पूर्णपणे बंद करण्याच्या विचारात असल्याचे पार्थ यांनी स्पष्ट केले आहे. जेएसडब्ल्यू ग्रुपचे संचालक सज्जन जिंदाल यांचे पुत्र असणारे पार्थ हे कंपनीच्या सिमेंट आणि रंग उद्योगाचे व्यवहार पाहतात. जेएसडब्ल्यू ग्रुप हा स्टील, सिमेंट आणि ऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये काम करते. पूर्व लडाखमधील गलवान खोर्‍यामध्ये झालेल्या हिसेंमध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरु झाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like