आर्थिकराष्ट्रीय

JSY Scheme | तुमचा सुद्धा झाला असेल विवाह तर केंद्र सरकार महिलांना देतंय 3400 रुपये, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – JSY Scheme | केंद्र सरकारच्या (Central Government) वतीने अनेक शासकीय योजना राबविल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये सरकार देशातील गरीब महिलांना आर्थिक मदत करते (JSY Scheme). या योजनेअंतर्गत सरकार महिलांना 3400 रुपयांची मदत देते (Janani Suraksha Yojana).

 

काय योजना आहे ?
देशातील दारिद्र्य रेषेखालील महिलांना सरकार अनेक प्रकारे आर्थिक मदत करते. आज आम्ही अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये केंद्र सरकार ही रक्कम गर्भवती महिलांना देते. जननी सुरक्षा योजना असे या योजनेचे नाव आहे. देशातील गर्भवती महिला आणि नवजात बालकांची स्थिती सुधारण्यासाठी सरकार ही योजना राबवत आहे.

 

ग्रामीण भागातील गर्भवती महिला
जननी सुरक्षा योजनेंतर्गत ग्रामीण भागात राहणार्‍या गरोदर आणि दारिद्र्य रेषेखालील महिलांना शासनाकडून 1400 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय प्रसूती सहकार्यासाठी आशा सहाय्यकांना 300 रुपये दिले जातात. त्याच वेळी, प्रसूतीनंतरची सेवा देण्यासाठी 300 रुपये देखील दिले जातात. (JSY Scheme)

 

शहरी भागातील गर्भवती महिला
या योजनेअंतर्गत, प्रसूतीच्या वेळी सर्व गर्भवती महिलांना रू. 1000 ची आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय, आशा सहाय्यकांना प्रसूती प्रोत्साहनासाठी रू. 200 आणि प्रसूतीनंतरची सेवा प्रदान करण्यासाठी रू. 200 प्रदान केले जातात. अशा प्रकारे एकूण 400 रुपये दिले जातात.

 

कोणती कागदपत्रे आवश्यक –

1. अर्जदाराचे आधार कार्ड
2. बीपीएल रेशनकार्ड
3. पत्त्याचा पुरावा
4. रहिवासी दाखला
5. जननी सुरक्षा कार्ड
6. सरकारी दवाखान्याने दिलेले डिलिव्हरी प्रमाणपत्र
7. बँक खाते पासबुक
8. मोबाईल नंबर
9. पासपोर्ट आकाराचा फोटो

 

या योजनेचा लाभ कसा घ्यावा –

तुम्हाला https://pmmodiyojana.in/wp-content/uploads/2020/03/jsy_guidelines_2006.pdf या लिंकवरून फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
या फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील भरा.
यानंतर, सर्व आवश्यक कागदपत्रे एकत्र जोडा.
अंगणवाडी किंवा महिला आरोग्य केंद्रात जाऊन अर्ज सादर करा.

 

कोण घेऊ शकतात लाभ
या योजनेअंतर्गत देशातील ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील गर्भवती महिला अर्ज करू शकतात. केवळ 19 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिलांना ही आर्थिक मदत दिली जाईल. या वयाखालील कोणतीही गर्भवती महिला या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही.

दोन मुलांच्या जन्माच्या वेळीच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत देशातील दारिद्र्य रेषेखालील महिलांनाच लाभ मिळतो.

 

Web Title :- JSY Scheme | janani suraksha yojana central government jsy scheme modi government

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Back to top button