JSY Scheme | विवाहित महिलांसाठी खुशखबर ! मोदी सरकार खात्यात ट्रान्सफर करेल 3600 रुपये, तात्काळ करा अर्ज
नवी दिल्ली : JSY Scheme | केंद्र सरकारकडून (Central Government) देशातील महिलांसाठी अनेक विशेष योजना राबवल्या जातात. आज आम्ही तुम्हाला केंद्र सरकारच्या अशाच एका खास योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये देशातील गरीब महिलांना आर्थिक मदत केली जाते. (JSY Scheme)
या योजनेअंतर्गत सरकार महिलांना एकूण 3400 रुपयांची आर्थिक मदत देते. या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेवूयात –
देशातील दारिद्रय रेषेखालील महिलांना सरकार अनेक प्रकारे आर्थिक मदत करते. आज आम्ही अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये केंद्र सरकार ही रक्कम गर्भवती महिलांना देते.
जननी सुरक्षा योजना Janani Suraksha Yojana (JSY) असे या योजनेचे नाव आहे. देशातील गर्भवती महिला आणि नवजात बालकांची स्थिती सुधारण्यासाठी सरकार ही योजना राबवत आहे.
जननी सुरक्षा योजनेंतर्गत ग्रामीण भागात राहणार्या गरोदर आणि दारिद्रय रेषेखालील महिलांना शासनाकडून 1400 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय आशा सहाय्यकांना प्रसूती प्रोत्साहनसाठी 300 रुपये दिले जातात. त्याच वेळी, प्रसुतीनंतरची सेवा देण्यासाठी 300 रुपये दिले जातात. (JSY Scheme)
या योजनेअंतर्गत, प्रसूतीच्या वेळी सर्व गर्भवती महिलांना प्रसुतीच्या वेळी रू. 1000 ची आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय, आशा सहाय्यकांना प्रसूती प्रोत्साहनासाठी रू. 200 आणि प्रसुतीनंतरची सेवा प्रदान करण्यासाठी रू. 200 प्रदान केले जातात. अशा प्रकारे एकूण 400 रुपये दिले जातात.
या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी आधार कार्ड (Aadhaar Card), बीपीएल रेशन कार्ड (BPL Ration Card), पत्त्याचा पुरावा (Address Proof), रहिवासी प्रमाणपत्र (Residence Certificate), जननी सुरक्षा कार्ड (Janani Suraksha Card), सरकारी रुग्णालयाकडून दिलेले प्रसुती प्रमाणपत्र (Maternity Certificate from Government Hospital), बँक खाते पासबुक (Bank Account Passbook), मोबाईल क्रमांक (Mobile Number), पासपोर्ट आकाराचा फोटो (Passport Size Photo) लागेल.
तुम्हाला https://pmmodiyojana.in/wp-content/uploads/2020/03/jsy_guidelines_2006.pdf या लिंकवरून फॉर्म डाउनलोड करावा लागेल. तुम्हाला या फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील भरावे लागतील.
Web Title :- JSY Scheme | janani suraksha yojana JSY Scheme central modi government amount get 3600 rupees
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 9,815 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी
- BSNL Recharge Plan | कोणतेही लिमिट नाही, 60 दिवसांसाठी मिळेल 100GB डेटा; फ्री कॉलिंग आणि खुपकाही
- EPFO Interest Rate | पुढील महिन्यात मोदी सरकार घेणार मोठा निर्णय, 24 कोटी लोकांना मिळेल खुशखबर?