बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीला सोडण्यासाठी पीडितेला न्यायाधीशांनी दिली ‘ही’ ऑफर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेतील लुसियानामध्ये एका खटल्यात न्यायाधीशाने आरोपीला सोडण्यासंदर्भात दिलेल्या ऑफरमुळे पीडितेला धक्का बसला. येथील एका प्रकरणात 16 वर्षानंतर निकाल देताना न्यायाधीशांनी सांगितलेल्या ता निर्णयाचा सर्वांनाच धक्का बसला. हिलर मूरे असे या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, न्यायाधीशांनी या प्रकरणात आरोपीला शिक्षा देण्याऐवजी तिला पैसे घेऊन हा खटला निकाली काढण्याची ऑफर दिली. यावेळी हि पीडित महिला न्यायालयात उपस्थित नव्हती. मात्र जर तिने या आरोपीची 12 वर्ष शिक्षा कमी करण्यास होकार दिला तर तिला 150,000 अमेरिकी डॉलर म्हणजेच जवळपास 1 कोटी 7 लाख रुपये मिळतील, अशी ऑफर तिला न्यायाधीशांनी दिली. मात्र पीडितेने ऑफर फेटाळून लावली असून तिने आरोपीला शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, 15 वर्षांपूर्वी या 31 वर्षीय पीडितेवर अत्याचार करण्यात आले होते. त्यामुळे मला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीची गरज नसून आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी तिने केली आहे. त्याचबरोबर मागील अनेक वर्षांपासून मला याची शिक्षा मिळाली असून मी आता थकले आहे. त्यामुळे आरोपीला कडक शिक्षा करण्यात यावी.

Visit : Policenama.com