Video : आरोपीने कोर्टात चक्क महिला जजसोबत केले फ्लर्ट, म्हणाला – ‘तुम्ही खूप सुंदर दिसतात, I LOVE YOU’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका आरोपीला व्हर्चुअल कोर्टात महिला न्यायाधीशासमोर हजर केले असता त्याने त्या न्यायाधीशासोबतच ‘फ्लर्ट’ करण्यास सुरुवात केली. अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये हा विचित्र विचित्र प्रकार घडला आहे. दरम्यान, न्यायाधीशासोबत फ्लर्ट करतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

डेमेट्रियस लेविस असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर चोरीचा आरोप आहे. त्याला झूम अ‍ॅपद्वारे गुरुवारी ब्रोवार्ड काउंटीच्या न्यायाधीश तबीथा ब्लॅकमोन यांच्यासमोर हजर केले होते. सुनावणीला सुरूवात होताच आरोपीने न्यायाधीशांना, जज… मला तुम्हाला फक्त हेच सांगायचे आहे की, तुम्ही खरंच खूप सुंदर दिसतात…आय लव्ह यू…आय लव्ह यू असे म्हटले. त्याचे बोलण ऐकून न्यायाधीश तबीथा ब्लॅकमोन यांच्या चेहऱ्यावरही काही क्षणासाठी हसू आले. कौतुक केल्याबद्दल त्यांनी आरोपीचे आभार मानले पण खुशामत करण्याचा प्रयत्न दुसरीकडे कर इथे त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असेही त्याला सुनावले. त्यानंतर 5,000 डॉलर बाँडवर त्याला तुरूंगात पाठवण्याचा आदेश दिला. दरम्यान आरोपी लेविस याला यापूर्वीही एका गुन्ह्यात चार वर्ष तुरूंगवासाची शिक्षा भोगली आहे. 2019 मध्ये त्याची तुरूंगातून सुटका झाली होती.