कंगना आणि राजकुमारच्या ‘जजमेंटल है क्या’ची ‘बॉक्स ऑफीस’वर ‘धमाल’, पहिल्या दिवशी कमवले ‘एवढे’ कोटी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कंगना रणौत आणि राजकुमार राव स्टारर जजमेंटल है क्या हा सिनेमा शुक्रवारी २६ जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. फर्स्ट डे शोनंतर पब्लिक आणि क्रिटीक्स ज्या पद्धतीने पाझिटीव रिव्ह्यु देत आहेत त्यावरून सिनेमा स्ट्राँग बॉक्स कलेक्शन करु शकतो अशी आशा व्यक्त केली जात आहे. चांगले रिव्ह्यु मिळाल्यानंतरही द लायन किंग या सिनेमाने जजमेंटल है क्या या सिनेमाल जबरदस्त टक्कर दिली आहे. असे म्हटले जात आहे की, जजमेंटल है क्या या सिनेमाने पहिल्या दिवशी ७-८ कोटींचं कलेक्शन केलं आहे.

रिपोर्ट्सनुसार या सिनेमाचं टोटल बजेट ३५ कोटींचं आहे. प्रेक्षकांनी या सिनेमाची स्टोरी आणि यातील कलाकरांचे खूपच कौतुक केले आहे. हा सिनेमा रिलीज होण्याआधी खूप चर्चेत आला होता. या सिनेमाच्या टायटलवरून खूप वाद झाला होता. अगोदर सिनेमाचे टायटल मेंटल है क्या असे होते. या टायटलवर इंडियन सायकेट्रीक सोसायटीने यावर आक्षेप घेतला होता. सिनेमाच्या टायटलवरून वाद झाल्यानंतर या सिनेमाचे टायटल बदलून जजटमेंटल है क्या असे करण्यात आले.

या सिनेमाची गोष्ट दोन मानसिक रुग्ण बॉबी (कंगना रणौत) आणि केशव (राजकुमार राव) यांच्यावर आधारीत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रकाश कोवेलामुडी यांनी केलं आहे. याशिवाय एकचा कपूर, शोभा कूपर आणि शैलेश आर सिंह यांनी हा सिनेमा प्रोड्युस केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –