‘माझ्यामुळं करिश्मा कपूरचं फिल्मी करिअर यशस्वी’, जुही चावलाचा खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री जुही चावला, करिश्मा कपूर आणि माधुरी दीक्षित यांचा बोलबाला होता. या तिघींनीही त्या काळात अनेक सुपरहिट सिनेमे दिले. करिश्माचा सिनेमा दिल तो पागल है आणि राजा हिंदुस्तानी हे सिनेमे तर ब्लॉकबस्टर ठरले. परंतु तुम्हाला माहिती आहे का करिश्मा कपूरच्याही आधी दुसऱ्याच अभिनेत्रीला हे सिनेमे ऑफर झाले होते.

जुही चावलानं इगोमुळं सोडला सिनेमा ?
जुही चावलानं असा दावा केला आहे की, किरश्मा कपूरच्याआधी हे दोन्ही सिनेमे ऑफर झाले होते. एका मुलाखतीत तिनं याबाबत खुलासा केला आहे. तिनं ती कारणं सांगितली आहेत ज्यामुळं तिनं ‘राजा हिंदुस्तानी’ आणि ‘दिल तो पागल है’ असे सिनेमे नाकारले होते. जुही म्हणाली की, “मला वाटलं होतं की, माझ्याशिवाय ही इंडस्ट्री काम करू शकणार नाही. मला सिनेमे मिळत गेले परंतु माझा ईगो माझ्या आड आला. ज्या सिनेमात मी काम करू शकत होते त्या सिनेमात मी काम केलं नाही. मी सोप्या कामला प्राधान्य दिलं. मी माझे निर्बंध मोडले नाहीत.”

https://www.instagram.com/p/B4yhkX2n-zb/

‘करिश्माचं करिअर मी बनवलं’ : जुही चावला
जुहीच्या या वर्तणुकीमुळं अनेक चांगले सिनेमे तिच्या हातून निसटले. तो टाईम आता पुन्हा येणार नाही. परंतु जुहीला असं वाटतं की, तिच्यामुळं इतर कलाकारंचं करिअर चमकलं. जुहीनं सांगितल्यानुसार, करिश्मा कपूरला एवढं नाव आणि प्रसिद्धी मिळाली याचं मोठं कारण ती आहे.

https://www.instagram.com/p/BwzeHbTBMfp/

https://www.instagram.com/p/B4DQlCFgOE1/