‘या’ टॉपच्या अभिनेत्रीची मुलं लाइम लाईटपासून ‘लांबच’

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जूही चावला इंडस्ट्रीचा प्रसिद्ध चेहरा आहे पण या इंडस्ट्रीपासून तिची फॅमिली नेहमी दूर राहते. जसे बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांचे स्टार किड्स यांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असतात तसेच जूही चावलाच्या मुलांना फार कमी लोक ओळखतात.

नुकताच अभिनेत्री जूही चावला हीने सोशल मिडियावर तिची मुलगी जान्हवीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जान्हवी स्कूल क्लास रुममध्ये बसलेली दिसून येत आहे. या अभिनेत्रीने फोटोसोबत लिहले की, ‘जान्हवी आपल्या स्कूलच्या समारोपला खुश ही होती आणि दुःखी ही’ अशी माहिती मिळाली आहे की, जूही चावलाची मुलगी धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे.

जूही चावलाच्या मुलीचा फोटो पाहून सोशल मिडियावर चाहत्यांचे मेसेज येणे सुरु झाले आहे. अनेक चाहते म्हणाले की, जूहीसारखीच तिच्या मुलीची स्माइल आहे. अनेक मुलींसोबत बसलेल्या जान्हवीला ओळखणे मुश्किल आहे. अनेक युजर्सने जूही चावला हीला प्रश्न केला की, यामधील तुझी मुलगी कोणती आहे ?

जूही चावलाचे दोन्ही मुले एक जान्हवी आणि मुलगा अर्जुन लाइम लाइटपासून दूर राहतात. सोशल मिडियावर दोघांच्या अ‍ॅक्टिव्हिटी खूप कमी दिसून येतात. जूही चावलाने १९९५ मध्ये बिजनेसमॅन जय मेहता यांच्यासोबत लग्न केले होते. जूही वेळोवेळी चित्रपटामध्ये काम करत राहते. जूहीला सोनम कपूर, अन‍िल कपूर आणि राजकुमार राव यांचा चित्रपट ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ मध्ये पाहिले होते.

आरोग्यविषयक वृत्त –

कोवळे ‘पिंपळपान’ हृदयातील ब्लॉकेजेसाठी वरदान

व्यायामाचा आनंद वाढविण्यासाठी ही आहे ‘बेस्ट आयडिया’

‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा