विकीलिक्सचा संस्थापक ज्यूलीयन असांज ला अटक

लंडन : वृत्तसंस्था – अमेरिकेत गोपनीय कागदपत्रे प्रकाशित करणे आणि स्वीडनमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी विकीलिक्सचा संस्थापक जुलियन असांजला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. या आरोपांनंतर त्याने इरक्वेडोरच्या दुतावासात शरण घेतली होती.

स्वीडनला त्याचे प्रत्यार्पण करण्याच्या विरोधात त्याने कायदेशीर लढाई सुरु केली होती. त्यानंतर त्याला जामीनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्ररकणी वारंट जारी करण्यात आले होते.

ब्रीटनचे गृह सचिव साजीद जावीद यांनी असांज याला अटक केल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने असांज याच्याविरोधात दस्तऐवज लीक केल्याप्रकऱणी आरोप केले होते.