मीका सिंहच्या गाण्यावर थिरकणार राय लक्ष्मी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – २०१७ मध्ये आलेला ‘जुली २’ हिंदी चित्रपटातून चांगलीच चर्चेत आलेली अभिनेत्री राय लक्ष्मी लवकरच एका नव्या अंदाजात दिसणार आहे. ५० हुन अधिक दक्षिण भारतीय चित्रपटात काम केलेली राय लक्ष्मी आता लवकरच पंजाबी गायक मीका सिंहच्या म्युजिक व्हिडिओ मध्ये थिरकणार आहे.

‘मजनू रीमिक्स’ नावाने हा व्हिडिओ रिलीज होणार आहे. या म्युझिक व्हिडीओचे काम माल्टा आईलैंडवर चालू आहे. तामिळ चित्रपटात आपल्या सौंदर्यतेने प्रेक्षकांवर भुरळ पाडणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी राय लक्ष्मी मीकाच्या गाण्यावरही मनमोहक पद्धतीने थिरकताना दिसणार आहे.

अलीकडेच अभिनेत्रीने स्वतः हा च्या सोशल मीडियावर या गाण्यासंबंधी काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये राय लक्ष्मी गायक मीका सिंह सोबत एका हॉट अवतार मध्ये दिसली. दुसऱ्या एका फोटो मध्ये राय लक्ष्मी आणि मीका सिंह सोबतच बालवीर सीरियल मधील भयंकर परी भूमिका साकारणारी शमा सिकंदर ही एका हॉट अंदाज मध्ये दिसून आली. ‘मजनू रीमिक्स’ मध्ये राय लक्ष्मी आणि मीका सिंह सोबतच शमा सिकंदर पण आपला जलवा दाखवणार आहे.

या गाण्यात काम करतानाचे अनुभव सांगताना लक्ष्मी म्हणाली, “या गाण्यातील कलाकार आणि क्रू मेंबर सोबत काम करताना खूप मजा आली. माल्टा आइलैंड वर या चार मित्रांसोबत शूट करताना खूपच छान वाटले. कामाबरोबर मित्रांसोबत कधी कधी वेळ घालवणेही गरजेचे असते.”राय लक्ष्मी शेवटी तमिळ चित्रपट नीया 2’मध्ये दिसली होती. तर या वर्षी लक्ष्मी तमिळ मधील ‘सिंडरेला’ आणि कन्नड चित्रपट ‘झांसी’ मध्ये दिसणार आहे.

सिनेजगत बातम्या

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री

अभिनेत्री रानी चॅटर्जीचा १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो व्हायरल !

‘बेबी डॉल’ सनी लिओनीच्या ‘त्या’ फोटोंनी सोशलचे वातावरण ‘गरम’

World Kiss Day : ‘या’ 5 चित्रपटांच्या पोस्टरवर किसिंन सीन, ‘या’ सिनेम्यात तब्बल 23 वेळा झाला ‘लिप लॉक’

प्रियंकासह बॉलिवूडमधील ‘या’ ३ अभिनेत्री कोट्याधीश ; जगतात ‘राजेशाही’ आयुष्य !

अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोलीने साधला दीपिका पादुकोणवर ‘निशाणा’ !

दुबईच्या प्रशासकाची ‘राणी’ २७१ कोटी घेवून ब्रिटीश ‘बॉडीगार्ड’सह पळून गेल्याचं उघड ; लंडनमध्ये करतेय ‘मौज’

सौंदर्यामुळे नव्हे तर ‘या’ ४ चित्रपटामुळे बदलले खा. अभिनेत्री नुसरत जहॉंची ‘लाईफ’

Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !