Jumbo Covid Hospital Pune | ‘जंबो कोव्हिड हॉस्पीटल ’ बाबत पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय घेणार – रविंद्र बिनवडे, अतिरिक्त पुणे महापालिका आयुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी राज्य शासन (Maharashtra Government) आणि महापालिकेने (PMC) आपत्कालीन परिस्थितीत मागीलवर्षी शिवाजीनगर येथील सीओईपी कॉलेजच्या मैदानावर (coep college ground) सुरू केलेले जंबो कोव्हिड हॉस्पीटल (Jumbo Covid Hospital Pune) बंद करण्याबाबत पालकमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (Ravindra Binwade, Add Municipal Commissioner) यांनी दिली. पुणे शहरातील कोरोनाची दुसरी लाट वेगाने ओसरत असून लसीकरणही ५० लाखांच्या जवळ पाहोचले आहे. अशातच राष्ट्रीय आरोग्य संस्थांनी कोरोनाची तिसरी लाटेची शक्यता नसल्याचा निर्वाळा दिल्याने मागील साडेचार महिन्यांपासून जंबो कोव्हिड हॉस्पीटल (Jumbo Covid Hospital Pune) बंद ठेवण्यात आले आहे.

मागीलवर्षी मार्चमध्ये सुरू झालेल्या कोरोना संसर्गाने पुणे शहरात हाहाकार माजविला होता. रुग्णसंख्या वीस हजारांच्यावर गेल्यानंतर शहरातील रुग्णालयांचे बेडस् कमी पडू लागले.
या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने पुण्यासह विविध जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत कोरोनावरील उपचारांसाठी तात्पुरती जंबो हॉस्पीटल (Jumbo Covid Hospital Pune) सुरू केली होती.
यावर्षी फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान आलेल्या दुसर्‍या लाटेतही या हॉस्पीटल्सच उपयोग झाला.
दरम्यान, मे महिन्यानंतर रुग्णसंख्या कमी झाल्याने जंबो हॉस्पीटलमध्ये नवीन रुग्णांना प्रवेश बंद करून त्यांना अन्य रुग्णालयात हलविण्यात आले.
मात्र, दुसरी लाट ओसरतानाच तिसर्‍या लाटेचीही शक्यता व्यक्त केली गेल्याने महापालिकेने (Pune Corporation) जंबो हॉस्पीटलचे
स्ट्रक्चरल ऑडीट करून घेत उभारलेली यंत्रणा तशीच ठेवण्याचा निर्णय घेत हॉस्पीटलला दोनवेळा मुदतवाढ दिली.
ही मुदत नुकतेच सप्टेंबरअखेर संपली असून अद्याप मुदतवाढ देण्यात आलेली नाही.

 

अशातच लसीकरणाचा वेग वाढविल्यानंतर शहरातील ऍक्टीव्ह कोरोना रुग्ण तसेच मृत्यूदरात कमालीची घट झाली आहे.
महापालिकेने बाणेर येथे १५० बेडस्चे आणखी एक हॉस्पीटल उभारले आहे.
तसेच शहरातील खाजगी व सरकारी रुग्णालयातीलही बरेच बेडस् रिक्त असल्याने जंबो हॉस्पीटल सुरू ठेवणे व्यवहारीकदृष्टया परवडणारे नाही.
याबाबत महापालिका काय निर्णय घेणार याबाबत विचारले असता अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी सांगितले, की जंबो हॉस्पीटलची मुदत सप्टेंबर अखेर संपली आहे.
त्यांना ऑक्टोबरचे पैसे द्यावेच लागणार आहेत. पालकमंत्र्यांसोबतच्या आगामी बैठकीमध्ये जंबो हॉस्पीटलबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.

 

Web Title : Jumbo Covid Hospital Pune | Jumbo Covid Hospital to be decided in Guardian Minister’s meeting – Ravindra Binwade, Additional Pune Municipal Commissioner

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ajit Pawar | आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणास सर्वोच्च प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

Must Do Before 31 October | 31 ऑक्टोबरपूर्वी ITR फाईल करण्यासोबतच करा ‘ही’ 4 महत्वाची कामे, अन्यथा होईल मोठे नुकसान; जाणून घ्या

Pune Corporation Elections | 3 सदस्यीय प्रभागामुळे ‘संधी’ चे टेन्शन ! त्यात निवडणूका पुढे जाणार? ही विवंचना