ग्रामीण पोलिस दलात ‘जम्बो’ फेरबदल

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नागपूर ग्रामीण पोलीस दलामध्ये ‘जम्बो’ फेरबदल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी ग्रामीण पोलीस दलातील २६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी बुधवारी (दि.२४) रात्री बदल्यांचे आदेश काढले आहेत.
कळमेश्वरचे ठाणेदार पोलिस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्याकडे उमरेडचा कारभार सोपविण्यात आला असून, उमरेडचे ठाणेदार प्रकाश हाके यांच्याकडे रामटेकची जबाबदारी देण्यात आली. नरखेडचे दिलीप मसराम यांची वाचक शाखा, बुटीबोरीचे हेमंत चांदेवार यांची बुटीबोरी एमआयडीसी, मधुकर गीते यांची मौदा, वाहतूक शाखेचे आसिफराजा शेख यांची बुटीबोरी, पंजाब परघणे यांची पारशिवनी, गजानन विखे यांची अरोली, मारुती मुळक यांची कळमेश्वर, अरुण त्रिपाठी- खापरखेडा, संतोष वैरागडे- भिवापूर, योगेश पारधी -सावनेर, अनिल जिट्टावार -वाहतूक शाखा, रवींद्र गायकवाड -नरखेड, अशोक साखरकर -विशेष शाखा, दीपक वंजारी -नियंत्रण कक्ष, हर्षल ऐकरे – खापा, सहायक पोलिस निरीक्षक श्याम गव्हाणे -कोंढाळी, शिवाजी मांडवलकर-कन्हान, प्रशांत मसराम- खापरखेडा,गणेश खंडाते -आर्थिक गुन्हे शाखा व विवेक सोनवणे यांची कळमेश्वर येथे बदली करण्यात आली.
केवळ सात दिवसांत दिला खटल्यावर निर्णय
नागपूर : सत्र न्यायालयाने जबरी चोरीच्या प्रकरणावर केवळ सात दिवसांत निर्णय दिला. प्रकरणातील आरोपीला बुधवारी दोन वर्षे कारावास व ३००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीश बी. जी. तारे यांनी हा निर्णय दिला. नीलेश दिलीप पोटफाटे (२७) असे आरोपीचे नाव असून, तो वरुड, जि. अमरावती येथील रहिवासी आहे. फिर्यादीचे नाव दालचंद हेमराज गजभिये (४२) असे आहे. ते नरखेड येथील रहिवासी आहेत. ही घटना १८ आॅक्टोबर रोजी घडली होती. गजभिये धम्मचक्र प्रवर्तन दिवसानिमित्त दीक्षाभूमी येथे जाण्यासाठी नागपूरला आले होते. ते दुपारी १२.३० च्या सुमारास मध्यवर्ती रेल्वेस्थानकावरून दीक्षाभूमीकडे जात असताना गणेश टेकडी मंदिरापुढे आरोपीने त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ सुरू केली तसेच त्यांच्या खिशातील २०० रुपये रोख व मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर गजभिये यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला व त्याला अटक केली तसेच प्रकरणाचा झटपट तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयानेही तातडीने सुनावणी पूर्ण करून निकाल दिला. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. राजेश श्यामसुंदर व अ‍ॅड. साधना बोरकर यांनी काम पाहिले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us