भावाला ‘लग्न’ करतो सांगून मारली नदीत उडी, प्रेमिका पडली ‘बेशुद्ध’

इंदौर : पोलीसनामा ऑनलाइन – गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दोघे प्रेमी मोटारसायकलवरुन इंदौरहून शिप्रा पुलावर पोहचले. तरुणाने मोबाईलवर आपल्या भावाला मी लग्न करायला जात आहे. असे म्हणून आपल्या प्रेमिकेकडे मोबाईल दिला आणि त्याने नदीत उडी मारुन आत्महत्या केली. हा प्रकार पाहून ही तरुणी जागेवरच बेशुद्ध पडली. सायंकाळी ही तरुणी शुद्धीवर आल्यावर तिने घडला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी नदीत तरुणाचा शोध घेतला तर त्याच्या ऐवजी दुसऱ्याच तरुणाचा मृतदेह सापडला.

राहुल बंजारा (वय ३०, रा. बाणगंगा) असे या तरुणाचे नाव आहे. सोनाली पाटील (वय २४) ही इंदौरमधील राहणारी आहे. दोघेही विवाहित आहेत. सोनालीला ६ वर्षाचा मुलगा असून राहुलला ५ वर्षाचा मुलगा आहे.
राहुलचे मेव्हणे रामलाल तलोदिया यांचे इंदौरमधील बंगाली चौकात लाँड्री आहे. या लाँड्रीमध्ये राहुल नेहमी बसत असे.

सोनाली ही एक महिन्यापूर्वी लाँड्रीत आली होती. तेव्हा तिची राहुलशी ओळख झाली. सोनालीचा पती ऑफिसबॉय म्हणून एका कंपनीत काम करतो. राहुल याने तिला आपले लग्न झाले नसल्याचे सांगितले. दोघेही लग्न करु इच्छित होते. सोनालीने आपल्या पतीला डोके दुखत असल्याचा बहाणा करुन डॉक्टरांकडे सोडण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्याने सोनालीला डॉक्टरांकडे सोडून तो कामाला निघून गेला. दुपारी राहुल व सोनाली शिप्रा येथील नदीच्या पुलावर आले.

राहुलने आपला भाऊ जितेंद्र याला फोन केला व त्याला सांगितले की, मी लग्न करतो आहे. असे म्हणून मोबाईल सोनालीला दिला व भावाशी बोल असे सांगितले. ती मोबाईलवर बोलायला लागली. तितक्यात राहुलने नदीच्या पाण्यात उडी मारली. हे पाहून सोनाली बेशुद्ध पडली. तिला तेथून जाणाऱ्या लोकांनी तातडीने रुग्णालयात नेले.

उपचारानंतर सोनाली सायंकाळी शुद्धीवर आली. तिने राहुलची चौकशी केली. तेव्हा तो वाहून गेल्याचे तिला सांगितले. त्यावर तिने त्याला तर पोहता येते, तो कसा वाहून जाईल. त्यानंतर तिने घडलेली हकीकत सांगितले. तेव्हा राहुलचे लग्न झाले होते, त्याला एक ५ वर्षाचा मुलगा असल्याचे सांगण्यात आल्यावर तिला धक्का बसला. राहुलने तिला आपण अविवाहित असल्याचे सांगितले होते.

तिच्या सांगण्यावरुन पोलिसांनी नदीत शोध घेतला. तेव्हा त्यांना दुसऱ्याच तरुणाचा मृतदेह सापडला. तिच्या सांगण्यानुसार पोलिसांना नदीच्या पुलावर मोटारसायकल मिळाली. लग्न झालेले असताना राहुलने अविवाहित असल्याचे का सांगितले?. जर लग्न करायचे होते तर, त्याने नदीत का उडी मारली?. जर त्याला पोहायला येत होते तर, मग तो पाण्यात बुडाला का ?. बुडाला असेल तर त्याचा मृतदेह कोठे आहे ?. असे अनेक प्रश्न पोलिसांना पडले आहेत.

Visit : Policenama.com