होर्डिंग दुर्घटनेत रेल्वे इंजिनियर गजाआड 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 
रेल्वे इंजिनियरच्या निदर्शनात होर्डिंग काढण्याचे  काम चालू होते, सुरक्षे कडे लक्ष  न देता हे काम करण्यात आले. यामध्ये ४ जणांचा मृत्यू तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे बंडगार्डन पोलिसांनी रेल्वे इंजिनियर संजय सिंह याला अटक केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3f6ae7ab-c91f-11e8-b521-677a79bdfc93′]

पुण्याच्या सर्वात जास्त रहदारीचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहीर अमर शेख चौकात २०१३ पासून अवैध रित्या होर्डिंग लावण्यात आले होते. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला वारंवार नोटीसही देण्यात आली होती. तसेच होर्डिंग अवैध आणि धोकादायक असल्या कारणाने काळ शुक्रवारी रेल्वे प्रशासना द्वारे होर्डिंग काढण्याचे काम सुरु करण्यात आले होते. ही काम रेल्वे इंजिनियर संजय सिंह यांच्या निदर्शनात  चालू होते, मात्र सुरक्षे कडे लक्ष न देता, तसेच होर्डिंग वरतून कापण्या  ऐवजी खालून कापण्यास सुरवात केली, त्यामुळे तिथे सिग्नल वर असलेल्या लोकांवर ते पडले. त्यादरम्यान  ४ जणांचा मृत्यू झाला तर ७ जण गंभीर जखमी आहेत.

महागाईचा राक्षस मारण्यासाठी करकपात करा : शिवसेना

 यासंदर्भात रेल्वे इंजिनियर ला दोषी ठरवत बंडगार्डन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच या संदर्भात आणखी तपस चालू आहे.  असे बंडगार्डन पोलीस चौकी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुजावर यांनी या संदर्भात माहिती दिली .

[amazon_link asins=’B00NXG86UE,B00NQ2RULQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f4729806-c91f-11e8-a1b1-39b02f71006a’]