पाटबंधारे विभागातील कनिष्ठ अभियंता 40 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन  – कडेपूरमधील टेंभू उपसा सिंचन उपविभागाच्या ओगलेवाडी शाखेत कार्यरत असणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यास ४० हजाराची लाच स्वीकरताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शुक्रवारी दुपारी कडेगाव येथे ही केली. नितीश निवृत्ती सुतार (वय २८) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तलाव दुरुस्तीच्या कामाचे बिल काढण्यासाठी सुताराने लाच मागितली होती.

तक्रारदाराने तलाव दुरूस्तीचे काम घेतले होते. काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे बिल काढण्यासाठी नितीन सुतार बिलाच्या दहा टक्के रक्कम म्हणजे ४९ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. एवढेच नाही तर पुढच्या कामात कोणताही त्रास देणार नसल्याचेही आश्वासन दिले होते. दरम्यान, तक्रारदाराने याबाबत सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गुरूदत्त मोरे, संजय संकपाळ, अविनाश सागर, सीमा माने, बाळासाहेब पवार आदींच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी करून शुक्रवारी दुपारी तडजोडीनंतर सुतार याला ४० हजार देण्याचे ठरले. लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.