Junior Hockey World Cup | भारताची सुवर्ण संधी हुकली; मात्र…

भुवनेश्वर : वृत्तसंस्था – Junior Hockey World Cup | टीम इंडियाचे एफआयएच ज्युनियर पुरुष हॉकी वर्ल्ड कप 2021 (Junior Men’s Hockey World Cup 2021) जिंकण्याचे स्वप्न दुसऱ्यांदा भंगले आहे. यावेळी जर्मनीने (Germany) भारताचा (India) 4-2 असा पराभव केला आहे. या स्पर्धेत सहावेळा चॅम्पियन असलेल्या जर्मनीची अंतिम फेरीत अर्जेंटिनाशी (Argentina) लढत होणार आहे. तर भारत तिसऱ्या स्थानासाठी फ्रान्सविरुद्ध (France) खेळणार आहे. भारताची हि स्पर्धा जिंकण्याची सुवर्णसंधी जरी हुकली असली तरी कांस्य पदक जिंकण्याची आशा अजून कायम आहे. भारताने जर फ्रान्सवर (France) विजय मिळवला तर भारताला कांस्यपदक मिळेल. भारताने याअगोदर फ्रान्सला 4-5 ने पराभूत केलं होतं.

 

2016 रोजी लखनऊमध्ये (Lucknow) ज्युनिअर वर्ल्ड कप जिंकलेल्या भारताला यावेळी जर्मनीविरुद्ध मात्र फारशी चमक दाखवता आली नाही.
यामुळे जर्मनीने भारताचा सहज पराभव केला. या सामन्यात जर्मनीकडून एरिक क्लेनलेन (Eric Kleinlen),
एरोन फ्लॅटन (Aaron Flatton), कर्णधार हेन्स मुलर(Hence Muller), ख्रिस्तोफर कुटर (Christopher Cutter) यांनी गोल केले. तर भारताकडून उत्तम सिंह (Uttam Singh) आणि बॉबी सिंह धामी (Bobby Singh Dhami) यांनी गोल केले.

 

क्वार्टर फायनलमध्ये भारताचा सामना बेल्जियमविरुद्ध (Belgium) झाला होता.
यावेळी भारताच्या बचाव फळीतील खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत बेल्जियमला नमवलं,
मात्र जर्मनीविरुद्ध बचावात भारत कमी पडला.यामध्ये भारताच्या मधल्या आणि
आघाडीच्या फळीत समन्वयाचा अभाव दिसून आला तर जर्मनीने मात्र सुरुवातीपासूनच सामन्यावर घट्ट पकड निर्माण केली होती.

 

Web Title :- Junior Hockey World Cup | junior hockey world cup india lose to germany in semi next to play france for bronze medal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा