खळबळजनक ! KEM रुग्णालयात डॉक्टरची ‘आत्महत्या’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील केईएम या नामांकित रुग्णालयातील एका डॉक्टरनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रणय जयस्वाल(28) असं या डॉक्टरचं नाव आहे. या घटनेनं प्रचंड खळबळ उडाली आहे. कर्मचाऱ्यांनाही या घटनेनं धक्का बसला आहे. प्रणय रुग्णालयात ज्युनियर रेसिडंट डॉक्टर म्हणून काम पाहात होते. या घटनेची पोलिसात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मेडिकल फिल्डमध्ये असल्यानं प्रणय यांना औषधांची चांगली माहिती होती. विषारी इंजेक्शन घेत त्यांनी आपलं आयुष्य संपवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. कोणतीही चिट्ठी किंवा संशयित वस्तू पोलिसांना घटनास्थळी आढळून आली नाही. RMO होस्टेलच्या छतावरून प्रणय यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. प्रणय गेल्या 6 महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होते अशी माहिती त्यांच्या रुम पार्टनरनं दिली आहे.

पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे. नोकरीनिमित्त मुंबईत राहणारे प्रणय जयस्वाल मूळचे अमरावती जिल्ह्यातील आहे. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबासह केईएम रुग्णालयात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती प्रणयच्या कुटुंबियांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like