ज्युनिअर तेंडुलकर मैदान गाजवण्यासाठी सज्ज 

श्रीलंका : वृत्तसंस्था

समस्त क्रिकेट प्रेमींना ज्याच्या खेळाची उत्सुकता लागली होती त्या अर्जुन तेंडुलकरचा खेळ आता लवकरच पाहायला मिळणार आहे.  भारताचा मास्टर ब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आता भारतीय क्रिकेट संघात अंडर १९ संघात निवड करण्यात आली आहे. भारताचा अंडर १९ संघ सध्या  श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान २ चार दिवसीय सामने आणि ५ वन डे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. यानिमित्ताने इतर खेळाडूंसहित अर्जुन देखील पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीत दिसला. या दौऱ्यातील पहिला चार दिवसीय कसोटी सामना दिनांक १७ जुलै रोजी ते २० जुलै दरम्यान तर दुसरा सामना २४ ते २७ जुलै दरम्यान खेळवला जाईल. तर वन डे मालिका 30 जुलै ते 10 ऑगस्टदरम्यान खेळवण्यात येणार आहे. अर्जुनसोबत टीम इंडियाचे अन्य सहकारीही श्रीलंका दौऱ्यासाठी सज्ज आहेत.
[amazon_link asins=’B073Z334RT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d9e890b9-85d7-11e8-acae-e1c84d28a0e7′]

अर्जुन तेंडुलकर नुकत्याच धरमशाला येथे झालेल्या २५ खेळाडूंच्या सराव शिबिरात सहभागी झाला होता. या शिबिरातील कामगिरीवरच त्याची अंडर 19 संघात निवड झाली. याबरोबरच दिल्लीचा विकेटकिपर फलंदाज अनुज रावतकडे या संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. अष्टपैलू म्हणून संघात अर्जुनची भूमिका महत्त्वाची असेल. फलंदाजीसोबतच डावखुरा जलदगती गोलंदाज म्हणून अर्जुनने चांगली कामगिरी बजावली आहे. यापूर्वी अर्जुन मुंबईच्या 14 वर्षांखालील आणि 16 वर्षांखालील संघात खेळला आहे. अर्जुन तेंडुलकरला घरातूनच क्रिकेटचा वारसा मिळाला आहे. अनेकांसोबत अर्जुनने सराव केला आहे. सीनियर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही अर्जुनला क्रिकेटचे धडे दिले होते.
[amazon_link asins=’B01HYCMO2S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’df3a8fe8-85d7-11e8-9168-673c888e7999′]

आता सचिन तेंडुलकर चा मुलगा अर्जुन तेंडुलकर पहिल्यांदाच भारताकडून क्रिकेट खेळणार आहे असे असताना समस्त क्रिकेटप्रेमींचे त्याच्या खेळाकडे लक्ष लागून राहिले आहे. पण “अर्जुनची माझ्यासोबत किंवा इतर कोणत्याही क्रिकेटर सोबत तुलना केली जाऊ नये ” अशी प्रतिक्रिया सचिन तेंडुलकरने दिली आहे.