Junnar Assembly Constituency | जुन्नरमध्ये अतुल बेनकेंना घेरण्यासाठी शरद पवारांचा शिलेदार ठरला? अजित पवारांच्या आमदाराविरोधात पवारांचे अनेक मोहरे मैदानात

Junnar Assembly Constituency | Sharad Pawar's mentor to surround Atul Benke in Junnar? Pawar's many pawns in the fray against Ajit Pawar's MLA

जुन्नर : Junnar Assembly Constituency | लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा (Sharad Pawar NCP) आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. आगामी विधानसभेसाठी (Maharashtra Assembly Election 2024) शरद पवारांनी विशेष लक्ष दिल्याचे बोलले जात आहे. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याविरोधात भाजपमधून (BJP) आयात केलेल्या समरजित घाटगेंना (Samarjeetsinh Ghatge) मैदानात उतरवण्याची पवारांनी तयारी केली आहे. तर इंदापूरमध्ये (Indapur Assembly Constituency) आमदार दत्तात्रय भरणेंना (Dattatray Bharne) घेरण्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला आहे.

त्यानंतर आता जुन्नरमध्ये आमदार अतुल बेनकेंना (Atul Benke) घेरण्यासाठी शरद पवार नव्या शिलेदाराला मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जुन्नर विधानसभा मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले (Mohit Dhamale) यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोहित ढमाले जुन्नर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. मोहित ढमाले यांनी २०१७ ते २०२२ या काळात जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना जुन्नर तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळवून देण्यात ढमाले यांची भूमिका महत्त्वाची ठरली असल्याचे बोलले जाते.

मोहित ढमाले यांनी पक्षाकडे विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे विधानसभा उमेदवारीच्या रुपाने शरद पवार मोहित ढमाले यांना निष्ठेचे फळ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Junnar Assembly Constituency)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa

Amol Balwadkar News | कोथरूड विधानसभा : भाजप नेते अमोल बालवडकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?; उद्या आशिर्वाद मेळाव्याद्वारे मोठे शक्ती प्रदर्शन करणार

Daund Assembly Constituency | इंदापूरनंतर आता दौंड विधानसभा मतदारसंघ चर्चेत; वस्ताद कोणता पैलवान राजकीय आखाड्यात उतरवणार?; चर्चांना उधाण

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case | Satish Wagh was killed by paying a supari of 5 lakhs; Out of the five accused, 3 accused were detained by the police; Neighbor committed act due to personal dispute (Video)

Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांची हत्या 5 लाखांची सुपारी देऊन; पाच आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; शेजारी राहणार्‍याने वैयक्तिक वादातून केले कृत्य (Video)