Junnar Pune Crime | झेंगाट ! लव्ह स्टोरीत तिसऱ्याची ‘एन्ट्री’, कट रचून एकाला गाडीखाली चिरडून मारलं; महिलेसह 2 जणांना अटक, घटना CCTV त कैद (Video)

पुणे/जुन्नर : पोलीसनामा ऑनलाइन – Junnar Pune Crime | अनैतिक संबंधाला (Immoral Relationship) अडथळा ठरत असल्याच्या कारणावरुन गाडी अंगावर घालून एका व्यक्तीचा खून केल्याची धक्कादायक घटना जुन्नर मधून समोर आली आहे. याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी (Narayangaon Police) सीसीटीव्हीच्या आधारे एका महिलेसह दोन जणांना शुक्रवारी रात्री अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.12) दुपारी नारायणगाव येथे पुणे-नाशिक महामार्गालगत (Pune Nashik Highway) असलेल्या अयोध्या हॉटेलसमोर घडली. (Murder Case)

साबीर मोहंमद शफी ब्यापारी (वय-45, रा. पणसुंबा पेठ, जुन्नर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्ह्यातील मुख्य आरोपी अभिजित सोनवणे (वय-28 रा. डिंगोरे), महिला आरोपी जेबा इरफान फकीर (वय-32 रा. पणसुंबा पेठ) यांच्यावर आयपीसी 302 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत साबीर ब्यापारी आणि जेबा फकीर हे दोघेही जुन्नर येथे एकमेकांच्या शेजारी राहतात. साबीर याचे जेबावर एकतर्फी प्रेम होते. जेबा ही कांदळी वसाहतीत एका कंपनीत कामाला होती. कामानिमित्त ती रोज जुन्नर ते कांदळी ये जा करत होती.

आरोपी अभिजित सोनवणे हा तालुक्यात शेतजमीन मोजणीचे काम करतो. प्रवासादरम्यान जेबा आणि अभिजित यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. ही माहिती साबीर ब्यापारी याला मिळाली. यावरून साबीर आणि अभिजित यांच्यात वाद निर्माण झाला होता. रमजान सणासाठी गुरुवारी अभिजित हा जेबा हिच्या घरी आला होता. यावेळी तू येथे का आलास? असा जाब साबीरने सोनवणे याला विचारला. यावरुन दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.

शुक्रवारी सकाळी जेबा नेहमीप्रमाणे कांदळी येथे जाण्यासाठी जुन्नर येथून बसने निघाली. त्यावेळी साबीरने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. साबीर आपला पाठलाग करत असल्याचे समजल्यानंतर जेबा हिने याची माहिती अभिजित याला फोन करुन दिली. शुक्रवारी दोनच्या सुमारास साबीर हा पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या अयोध्या हॉटेलसमोर दुचाकीवर थांबला होता.

अभिजित याने साबीरच्या अंगावर कार घालून त्याला चिडरडले. यात साबीर याचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व थरार सीसीटीव्ही कँमेरात कैद झाला. या घटनेनंतर शुक्रवारी सायंकाळी मुस्लीम समजाचा मोठा जनसमुदाय नारायणगाव पोलीस ठाण्यात जमा झाला. आरोपीला अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करुन आरोपी अभिजित सोनवणे याला पिंपळवंडी येथून ताब्यात घेतले. त्यानंतर महिला आरोपीला ताब्यात घेतले. आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार (API Mahadev Shelar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Election In Maharashtra | बारामती, रायगडसह 11 मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी प्रक्रिया सुरू; 7 मे रोजी मतदान

Mundhwa Pune Crime | पुणे : प्रेमाच्या जाळ्यात ओढले, लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर बलात्कार