‘गुरू’ आजपासून मार्गस्थ होणार, जुलै 2021 पर्यंत 4 राशीच्या जातकांची धन-उद्योगात ‘प्रगती’

पोलीसनामा ऑनलाइन – सौरमंडळातील पाचवा सर्वात मोठा ग्रह गुरू रविवार, 13 सप्टेंबरपासून मार्गस्थ झाला आहे. 14 मे, 2020 पासूनच गुरू वक्री होता. आज सकाळी सुमारे 6 वाजून 10 मिनिटांनी गुरू मार्गस्थ झाला. तो 20 जुलै, 2021 पर्यंत मार्गस्थ राहणार आहे. ज्योतिषतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गुरूचे सरळ मार्गक्रमण हे मिथुन, कर्क, तुळ आणि वृश्चिक राशीच्या जातकांसाठी जुलै, 2021 पर्यंत आर्थिक लाभ देणारे आहे. तर काही जातकांना या काळात सावध राहावे लागेल.

मेष
मेष राशीच्या जातकांच्या नवम भावात (भाग्य भाव) गुरूचे मार्गस्थ होणे तुमच्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणी दूर होतील. आरोग्यात सुधारणा होईल. विद्यार्थी अथवा स्पर्धा परीक्षा देणार्‍यांसाठी सुद्धा गुरूचे मार्गस्थ होणे शुभ संकेत देणारे आहे. नोकरीत बढती आणि मान-सन्मानात वाढीचे योग आहेत. परदेश प्रवास किंवा परदेशी नागरिकत्वासाठी प्रयत्न करायचे असतील तर आवश्यक करा, अनुकूल स्थिती आहे. संततीसंबंधी चिंता दूर होईल.

वृषभ
वृषभ राशीच्या जातकांच्या अष्टम भावात गुरूचे गोचर आणि मार्गस्थ होणे पूर्वीपेक्षा चांगले अनुभव देणारे आहे. परंतु कार्यक्षेवात षडयंत्रात फसणार नाहीत, याची काळजी घ्या. चुकीच्या लोकांच्या संगतीपासून दूर राहा. कोर्ट-कचेरीची प्रकरणे सुद्धा सोडवून टाकणे चांगले ठरेल. आरोग्याच्या बाबतीत जागृत राहा. खर्चात वाढ होऊ शकते. घर, वाहन खरेदी करण्याचा संकल्प पूर्ण होऊ शकतो.

मिथुन
गुरूचे मार्गस्थ होणे मिथून राशीच्या जातकांसाठी चांगले ठरू शकते. धार्मिक कार्यात आवड वाढेल. सोबतच लग्नाची बोलणीसुद्धा यशस्वी होतील. सासरच्या लोकांकडून सहकार्याची आशा आहे. केंद्र किंवा राज्य सरकारच्या प्रमुख संस्थांमध्ये नोकरी किंवा इतर बाबींसाठी अर्ज करणे चांगले ठरेल. लग्न भावावर गुरूच्या शुभ दृष्टीचा प्रभाव म्हणून आरोग्य उत्तम राहील. धाडस, पराक्रमात वाढ होईल. उत्पन्नाची साधने वाढतील.

कर्क
कर्क राशीच्या जातकांच्या सहाव्या भावात गुरूच्या मार्गस्थ होण्याने गुप्त शत्रूंच्या वाढीचे योग होत आहेत. वरीष्ठ अधिकार्‍यांशी मधूर संबंध कायम ठेवा. आरोग्याच्या बाबतीत सुद्धा सतत जागृत राहावे लागेल. कुणा नातेवाईक किंवा मित्राकडून दु:खद बातमी समजू शकते. आर्थिक व्यवहाराच्या प्रकरणात सावध राहा. जास्त कर्ज घ्यावे लागणार नाही, असा प्रयत्न करा. अडकलेले पैसे पुन्हा मिळण्याचे आणि अचानक धनप्राप्तीचे सुद्धा योग आहेत. व्यापारासाठी काळ अनुकूल आहे.

सिंह
सिंह राशीच्या जातकांच्या पंचम भावात गुरूचे मार्गस्थ होणे तुम्हाला शिक्षणाच्या क्षेत्रात अनपेक्षित यश देईल. कोणतीही स्पर्धा परीक्षा किंवा नोकरीत नवीन करारावर हस्ताक्षर करायचे असतील, तर त्यादृष्टीने काळ खुप अनुकूल आहे. शासकीय सत्ता आणि आपल्या अधिकारांचा पूर्ण सदुपयोग करा. संततीसंबंधी तणाव दूर होईल. भावांचे सुद्धा सहकार्य मिळेल.

कन्या
कन्या राशीतून चतुर्थ भावात गुरूचे मार्गस्थ होणे तुम्हाला आई-वडिलांकडून आर्थिक सहकार्य मिळवून देईल. सोबतच मित्र तसेच ओळखीच्यांशी संबंध मधूर होतील. खुप दिवसांपासून प्रलंबित असलेले काम मार्गी लागेल. घर अथवा वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेणार असाल तर काळ अनुकूल आहे. दशम भावावर गुरूच्या शुभ दृष्टीचा परिणामस्वरूप केंद्र किंवा राज्य सरकारशी संबंधित कामे मार्गी लागतील.

तुळ
तुळ राशीच्या जातकांच्या कुंडलीत गुरू ग्रहाचे तिसर्‍या भावात मार्गस्थ होणे तुमच्यात धाडस वाढवणारे आहे. तुमच्याकडून घेतले गेलेले निर्णय आणि कामांचे कौतूकसुद्धा होईल. आर्थिक बाजू मजबूत होईल. कुटुंबातील वरीष्ठ सदस्य तसेच बंधूंचे सहकार्य मिळण्याचे अपेक्षा करू शकता. परदेशी नागरिकत्वासाठी अर्ज केल्यास यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काळ आणखी अनुकूल आहे.

वृश्चिक
वृश्चिक राशीच्या जातकांच्या धन भावात गुरूचे मार्गस्थ होण्याने जातकांची आर्थिक बाजू मजबूत करणारे आहे. तुमच्या सौम्य स्वभावाच्या फलस्वरूप जेथे जाल तेथे चाहत्यांची गर्दी वाढेल. जमीन जुमल्याशी संबंधीत प्रकरणे मार्गी लागतील. वाहन खरेदी करण्याची इच्छा असेल तर अनुकूल संधी आहे. गुरुच्या आयु भावावर दृष्टीच्या परिणामस्वरूप आरोग्याच्या बाबतीत जागृत राहावे लागेल. परदेशातील मित्र आणि संबंधितांकडून मिळालेल्या सुखद बातमीमुळे मन प्रसन्न राहील.

धनु
धनु राशीत स्वत: गुरूचे मार्गस्थ होणे तुमच्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. खुप दिवसांपासून असलेला मानसिक तणाव दूर होईल. आरोग्याच्या बाबतीत सुद्धा खुप चांगली जाणीव होईल. शत्रूंवर मात कराल आणि कोर्ट-कचेरीच्या प्रकरणात सुद्धा निर्णय तुमच्या बाजूने येण्याचे संकेत आहेत. संतती संबंधीच्या चिंतांमधून मुक्ती मिळेल.

मकर
गुरुचे मार्गस्थ होणे मकर राशीच्या जातकांसाठी फारसे चांगले म्हणता येणार नाही, कारण तुमचा अनावश्यक खर्च वाढेल. जास्त धावपळ होईल. वाहन सावधगिरीने चालवा. अपघातांपासून स्वताचा बचाव करा. अनावश्यक वादापासून सुद्धा दूर राहा. गरजूंना मदत करण्यासाठी नेहमी पुढे राहाल, ज्यामुळे समाजात मान सन्मान वाढेल. शत्रू वाढतील आणि ते तुमची मानहानी करण्याचा प्रयत्न करतील.

कुंभ
कुंभ राशीच्या जातकांच्या जन्मकुंडलीत लाभ भावातून गुरूचे मार्गस्थ होणे चांगले ठरेल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आणि बंधूंकडून सुद्धा लाभाची अपेक्षा आहे. वरीष्ठ अधिकार्‍यांशी चांगले संबंध ठेवा. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांना बसणार्‍या विद्यार्थ्यांसाठी काळ आणखी अनुकूल आहे. आपल्या शक्तीच्या बळावर कठिण स्थितीवर सुद्धा विजय प्राप्त कराल. संतती संबंधी चिंता कमी होतील. व्यापारात लाभ होईल.

मीन
मीन राशीचा स्वामी गुरूचे दशम भावातून मार्गस्थ होणे व्यापारात प्रगतीचे संकेद देत आहे. प्रलंबित कामे मार्गी लागतील. सरकारी नोकरीसाठी अर्ज करणे सुद्धा शुभ ठरेल. परदेशी नागरिकत्वासाठी किंवा परदेशी कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास परिणाम तुमच्या बाजूने राहतील. गुरूच्या चतुर्थ भावावर दृष्टीच्या परिणामस्वरूप मित्र तसेच आप्तांकडून सहकार्याचे योग आहेत.