Jupiter Transit 2020 : 59 वर्षानंतर गुरु-शनीचा दुर्लभ योग, 5 महिने देश-जगावर संकट ! 12 राशींवर असा होईल परिणाम

पोलीसनामा ऑनलाइन – गुरुने 20 नोव्हेंबरला मकर राशीत प्रवेश केला आहे. हा ग्रह अजूनपर्यंत वक्री आवस्थेत धनु राशीत होता. मकर राशीत गुरु खुप कमजोर मानला जातो. या राशीत गुरुसह शनीसुद्धा आहे. देश-जगावर या गोचरचा खोलवर प्रभाव पडू शकतो. गुरुचे हे गोचर शनीमुळे जास्त महत्वाचे झाले आहे. शनी आणि गुरुचा योग यापूर्वी 59 वर्षांपूर्वी झाला होता.

शनि-गुरुचा हा योग तेव्हा सुद्धा चांगला सिद्ध झाला नव्हता, आणि आताही तो सुरूवातीला चांगला दिसत नाही. गुरु आणि शनीचा हा संबंध जगभरात अस्थिरता निर्माण करू शकतो. युद्ध, राजकीय अस्थिरता आणि मंदीसारखी स्थिती तयार होईल. मात्र, भारताच्या स्थितीत हळुहळु सुधारणा होईल. राहुवर गुरुची दृष्टी असल्याने अनेक गोष्टी नियंत्रणात राहतील.

12 राशिंवर असा होईल परिणाम
मेष –
करियर आणि व्यापाराच्या बाबतीत शुभ असेल. धन-प्रॉपर्टीमध्ये लाभाचे योग आहेत. आर्थिक स्थितीत खुप सुधारणा होईल. पूजा उपासनेवर विशेष लक्ष दिल्याने लाभ होईल.

वृषभ –
वृषभ राशीच्या लोकांना आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. पैशासंबंधीची प्रकरणे हळुहळु रूळावर येतील. यावेळी प्रत्येक गुरुवारी केळी दान करत राहा.

मिथुन –
आरोग्याबाबत खबरदारी घ्यावी लागेल. महामारीच्या काळात आपली आणि कुटुंबाची देखभाल करा. करियरमध्ये थोडे अडथळे येऊ शकतात. ईश्वराची उपासना केल्याने समस्या सुटतील.

कर्क –
करियर आणि आर्थिक स्थितीत अद्भुत सुधारणा होईल. नोकरी-व्यापारात प्रगती होईल. आरोग्याच्या समस्या सुटत जातील. विवाह-प्रेम संबंधात प्रकरणे मार्गी लागतील.

सिंह –
करियरमध्ये परिवर्तन आणि लाभाचे योग आहेत. नवी नोकरी किंवा व्यापारात हात टाकल्यास यश मिळू शकते. आरोग्य समस्यांचा योग बनत आहे. खाणे-पिणे आणि जीवनात सात्विकता ठेवा.

कन्या –
सध्या नात्यांकडे विेशेष लक्ष द्या. शिक्षण आणि करियरची स्थिती चांगली राहील. चांगले परिणाम मिळतील. रोज पहाटे गुरुचा मंत्रजप करा.

तुळ –
करियर आणि जीवनात परिवर्तनाचे योग आहेत. लाइफस्टाइल पहिल्यापेक्षा चांगली होत जाईल. आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. गुरुवारी पिवळ्या वस्तू दान करा.

वृश्चिक –
करियरच्या प्रकरणात बेजबाबदारपणा करू नका. नोकरी किंवा परीक्षेच्या तयारीत एकाग्रतेत कमतरता येऊ देऊ नका. आरोग्याची स्थिती हळुहळु सुधारेल. सध्या सोन्याची अंगठी तर्जनीत बोटात घाला.

धनु-
करियरमध्ये काही बदल आणि आर्थिक सुधारणांचे योग आहेत. नोकरी व्यापारात लाभ मिळू शकतो. कुटुंब आणि सासुरवाडीच्या नात्यात समस्या येऊ शकतात. सल्ला घेऊन पिवळा पुष्कराज धारण करा.

मकर –
सध्या करियरमध्ये खुप उंचीवर पोहचू शकता. मेहनती लोकांसाठी काळ खुप चांगला आहे. पोट आणि लिव्हरच्या समस्येकडे लक्ष द्या. रोज पहाटे गुरुच्या मंत्राचा जप करा.

कुंभ –
खर्च आणि व्यवस्थापनावर लक्ष द्या. गुंतवणुकीसाठी वेळ चांगली नाही. परदेशाशी संबंधित लोकांना लाभाचे योग आहेत. यावेळी जास्तीत जास्त इश्वराची उपासना लाभदायक होईल.

मीन –
करियरमध्ये लाभाचे उत्तम योग आहेत. नोकरीत चांगल्या संधीचे योग बनतील. प्रेमसंबंधात आणि वैवाहिक प्रकरणात समस्या होऊ शकतात. सल्ला घेऊन पिवळा पुष्कराज धारण करा.