‘गुरू’ ग्रहाचं आज मोठं परिवर्तन, 12 वर्षानंतर राहणार ‘शनि’सोबत, 9 राशी ‘भाग्य’शाली तर 3 वर पडणार ‘भारी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जवळपास 12 वर्षातून एकदा शनि आणि गुरु ग्रहाचे मिलन एका राशीत होते. अनेक वर्षांनंतर यांचे मिलन गुरुच्या राशी धनुमध्ये होईल. शनि आणि केतू पहिल्यापासूनच तेथे आहेेत आता गुरुच्या येण्याचे तीन ग्रह एकत्र असतील. त्यांच्यावर राहू किंवा मंगळची देखील दृष्टी आहे. 10 नोव्हेंबरला मंगळाच्या तुळ राशीतील प्रवेशानंतर त्यांची दृष्टी समाप्त होईल. हाच संयोग त्यांच्या प्रभावात आणि परिणामात आकस्मितेला जन्म देईल, जो 26 जानेवारी 2020 ला शनिवारी मकर राशीत प्रवेशानंतर समाप्त होईल. मंगळाची दृष्टी देखील 10 नोव्हेंबरला तुळ राशीत प्रवेश करुन समाप्त होईल.

शनिला मृत्यू लोकात न्याय देवता मानले जातात आणि गुरु शिक्षण कार्य, लेखन, प्रकाशन, धर्म अध्यात्म ज्ञान इत्यादींचे देवता मानले जातात. त्यांची युती संन्यासींसाठी प्रभावी पडते. आध्यात्मिक जगतात या तिन्ही ग्रहांचे मिलन प्रभावी असणार आहे. व्यापारी क्षेत्रात या ग्रहांचे एकत्र असणे फायदेशीर ठरेल आणि शनि-केतूच्या अशुभतेमध्ये देखील कमी येईल. कोणत्या कोणत्या राशीवर याचे काय काय परिणाम होतील, हे पाहणे फायदेशीर ठरेल.

मेष रास
या राशीत ही युती बाधा दूर करेल, लाभ मार्ग प्रशस्त होईल. परदेश दौऱ्याचा योग आहे. व्यापारी आणि विद्यार्थ्यांना परिणाम फायदेशीर ठरेल.

वृषभ रास
या ग्रहांच्या मिलनाचा या राशीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात. फसवणूक होण्याची शक्यता आहे. कोणतेही काम उरकल्यावर थेट घरी जावे. न्यायालयीन प्रकरणं ही न्यायालयाबाहेर सोडवावीत.

मिथुन रास
दांपत्य जीवनात अशुभ परिणाम होतील. विवाहसंबंधित चर्चा सफल होईल. व्यवसायात विकास होईल. नोकरीत पदोन्नती होईल. त्याचा लाभ घ्या.

कर्क रास
या राशीच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. न्यायालयात प्रकरणात अडचणी येणार नाहीत. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. आई वडीलांची काळजी घ्या.

सिंह रास
शिक्षण क्षेत्रात यश मिळेल. प्रेमसंबंधात निराशा होईल. स्पर्धेत सहभागी होणार असाल तर फायदा होईल. परदेश प्रवासाचा योग आहे, मंगल कार्य पार पडू शकते.

कन्या रास
मित्रांकडून समस्या उद्भवू शकतात. घर वाहन घेण्याचा योग आहे. नोकरीत प्रगती होईल, प्रवासात सामान चोरी होण्याची शक्यता आहे.

तुळ रास
या ग्रहांच्या एकत्र येण्याने तुमच्या पराक्रमात वाढ होईल. तुम्ही घेतलेल्या निर्णयांची, कामची स्तुती होईल. कुटूंबात समतोल राखा, स्वभावातील राग, रोष नियंत्रणात ठेवा. वरिष्ठांशी जवळीक वाढेल.

वृश्चिक रास
धनलाभ होईल. तुमच्या बोलण्याचा कुशलतेमुळे कठीण प्रसंगावर मात कराल. मागसिक अशांतीत वाढ होईल.

धनु रास
जीवनातील अशुभता कमी होईल. कोणते कार्य जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत सार्वजनिक करु नका. प्रवासाचा योग आहे. सरकारी कामे पार पडतील.

मकर रास
ग्रहांच्या एकत्र येण्याचा तुमच्या खर्चावर परिणाम होणार आहे, जपून खर्च करा. आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. प्रवासाचा योग आहे. 10 नोव्हेंबरनंतर यात सुधारणा होईल. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ रास
धन परत मिळेल. नव्या व्यवसायाचा सुरुवात लाभकारक ठरेल. कुटूंबात संबंध चांगले राहतील. विवाहासंबंधित चांगली बातमी मिळेल.

मीन रास
कार्यक्षेत्राचा विस्तार होईल. सन्मान वाढेल. सामजिक पदप्रतिष्ठा वाढेल. धार्मिक आणि मंगल कार्यात सहभाग घ्याल.

Visit : Policenama.com

नकारात्मक विचारांमुळे वाढू शकतो चिडचिडेपणा, ‘या’ 8 गोष्टींची काळजी घ्या
सर्वात फिट अ‍ॅक्टर अक्षय कुमार कोणता व्यायाम करतो ? जाणून घ्या
स्नायूंच्या दुखण्यांपासून दूर राहण्याचे ‘हे’ 4 सोपे मार्ग, जाणून घ्या
सावधान ! वर्कआउटनंतर कधीही करु नका ‘या’ 4 गोष्टी, जाणून घ्या
हातांचे सौंदर्य वाढवतात नखे, त्यांची काळजी ‘या’ 5 प्रकारे घ्या
तारूण्यातच द्या आरोग्याकडे लक्ष…अन्यथा मध्यमव्यासह म्हातारपणी होईल त्रास

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like