एकता कपूरनं तब्बल 17 वर्षांनंतर काढल्या हातातील सर्व अंगठ्या आणि ब्रेसलेट ! ‘हे’ आहे कारण

पोलीसनामा ऑनलाईन :टीव्ही आणि फिल्मची प्रोड्युसर एकता कपूर जोतिष आणि न्यूमेरोलॉजीवर विश्वास ठेवते. ती नेहमीच हातात अनेक अंगठ्या आणि ब्रेसलेट घालते. तिला बिना अंगठ्या आणि ब्रेसलेटचं क्वचितच कोणी पाहिलं असेल. एकतानं आता सर्व अंगठ्या काढल्या असून हात पूर्ण रिकामा केला आहे. एकतानं नुकताच तिच्या इंस्टावरून एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिनं अंगठ्या काढल्या आहेत. एकताचा हा व्हिडीओ पाहून सारेच चकित झाले. चाहत्यांसोबतच सेलेब्सनंही तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली. आता याचा खुलासाही झाला आहे.

एकतानं शेअर केलेल्या व्हिडीओवर ये हैं मोहब्बतें मालिकेतील लिड अॅक्टर करण पटेल यानं लिहिलं की, खरंच ? असा विचार मी कधीच केला नव्हता की, जीवनात मी तुला कधी असं बघेन. अभिनेत्री हिना खाननंही आश्चर्य व्यक्त विचारलं की, हे कसं झालं ?

एकता कपूरनं हिना खानला रिप्लाय करत यामागील कारण सांगितलं आहे. तिनं सांगितलं की, साबण आणि सॅनिटायजरचा जास्त वापर केल्यानं हाताला अॅलर्जी झाली आहे. ती लवकरच अंगठ्या आणि ब्रेसलेट पुन्हा घालणार आहे.
image.png

एकतानं 2003 साली या अंगठ्या घालायला सुरुवात केली होती. एकता न्युमेरोलॉजी फॉलो करते. ती बालाजीला खूप मानते. एके काळी तिच्या मालिकांची नावं के या अक्षरांनी सुरू व्हायची. नंतर तिनं मालिकांना वेगळी नावं द्यायला सुरुवात केली.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like