लग्नानंतर अवघ्या २३ दिवसातच तरुणाने कोरोनामुळे गमावला प्राण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या महामारीत अनेक लोकांचा प्राण जात आहे. अनेक वेगवेगळ्या आणि विचित्र आणि हृदयाला पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना मध्य प्रदेश राज्यात घडली आहे. तेथील राजगढ जिल्ह्यातील चक्क २३ दिवसापूर्वी लग्न झालं होत. लग्नानंतर नवरदेवाला कोरोनाची बाधा झाल्याने त्यातच त्याने आपला प्राण गमावला आहे. अशी हृदयद्रावक घटना घडली आहे. अजय शर्मा (वय, २५) असे त्या नवरदेवाचे नाव आहे.

अधिक माहितीनुसार, अजय शर्मा तरुणाचा २५ एप्रिल रोजी सिहोर येथे विवाह झाला. कोरोना नियमांचे पालन करत एका मंदिरात मर्यादित लोकांमध्ये हा विवाह पार पडला होता. परंतु, विवाहानंतर ४ ते ५ दिवसानंतर तरुणाची तब्येत बिघडली आणि शेवटी २५ एप्रिल रोजी त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांपैकी १ महिलेला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर अजयला त्याच्यावर स्थानिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक खालावत चालल्याने त्याला भोपाळला रुग्णालयात दाखल करण्यात आले. भोपाळच्या रुग्णालयात एक आठवडा अजय व्हेंटिलेटरवर होता. परंतु, उपचारांचा काहीच फायदा झाला नाही. अखेर कोरोनामुळे त्याने आपला जीव गमावला.

या दरम्यान, अजयचा विवाह राजगढ जिल्ह्यातील नरसिंहगढ ब्लॉकमधील मोतीपुरा गावातील अन्नू शर्मा नावाच्या तरुणीशी झाला. अन्नू या तरुणीचे कुटुंब सिहोरमध्ये वास्तव्यास असल्याने लग्न तेथेच पार पडले. या लग्नात कुटुंबातील काही निवडक सदस्यच उपस्थित होते.