खुशखबर ! आता सरकारी बँका देखील देणार 59 मिनिटांत 1 कोटीचं कर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॅंकेकडून कर्ज मिळवण्यासाठी आता फेऱ्या माराण्याची गरज राहणार नाही. कारण आता एका फेरीतच तुम्हाला कार आणि घर खरेदी कराण्यासाठी कर्ज मिळू शकणार आहे. त्यासाठी सरकारी बॅंका 59 मिनिटांत एक कोटीचं कर्ज देण्याची नवीन योजना आणत आहे. सध्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना कर्ज देण्यासाठी अशी योजना उपलब्ध आहे.

बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक सलील कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना कार आणि घर खरेदी कराण्यासाठी 59 मिनिटांत कर्ज दिले जाईल. या योजनेमुळे सामान्य लोकांना कर्ज घेणे सोपं होणार आहे.’psbloansin59minutes’ यावर ही सुविधा उपलब्ध होईल.

सार्वजनिक क्षेत्रातील (पीएसयू) बँकांनी ग्राहकांना 59 मिनीटात घर आणि वाहन कर्जासाठी योजनेवर काम सुरू केले आहे. यासाठी बँकांनी ही सुविधा ‘psbloansin59minutes’ वर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय इंडियन ओव्हरसीज बँकदेखील या योजनेवर काम करत आहे. सध्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना 1 कोटी रुपयांपर्यंत अवघ्या 59 मिनिटांत कर्ज देण्याची योजना एमएसएमई पोर्टलवर सुरू आहे.

आरोग्यविषयक वृत्त –