‘औरंगजेबाला ज्याप्रमाणे स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे, त्याप्रमाणे चंद्रकांत पाटलांना अजितदादा दिसतात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांच्यात शाब्दिक वाद सुरु आहे. आता या दोघांच्या वादात राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी उडी घेतली आहे. औरंगजेबाला ज्याप्रमाणे स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे, त्याप्रमाणे चंद्रकांतदादांना स्वप्नात केवळ अजित पवारच दिसतात, असा टोला मिटकरी यांनी लगावला आहे. तसेच महाविकास आघाडीची सत्ता पुढील 15 वर्षे असेल, असा दावा मिटकरी यांनी केले आहे. मिटकरी यांनी केलेल्या दाव्यानंतर आता भाजप नेते काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बाबा रामदेव यांनी शेयर केला आमिर खानचा जुना व्हिडिओ, ‘मेडिकल माफियां’ना दिले आव्हान (Video)

चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. ज्याप्रमाणे पाण्यातील मासे पाण्याविना तडफडत असतात, त्याप्रमाणे राज्यातील भाजप नेत्यांची आवस्था आहे. त्यांनी उगाच सत्तेची स्वप्न पाहू नये, असे मिटकरीनी म्हटले आहे. ठाकरे सरकार मध्यरात्री पडेल, असे वक्तव्य पाटील यांनी केले होते. त्याला उत्तर देताना पवार यांनी सरकार जाणार असे विधान पाटील यांनी जागे असताना केले होते, की झोपेत केले होते, असा प्रश्न उपस्थित केला होता. तेंव्हापासून या दोघात शाब्दिक वाद सुरु झाला आहे. अजित पवारांच्या टिकेवर पाटलांनी उत्तर दिले होते. पवारांनी भाजपवर टिका करताना तोंड सांभाळून बोलावे. नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत, आम्ही बोलायला लागलो, तर महागात पडले, असे पाटील यांनी अजित पवारांना सुनावले होते.

Also Read This : 

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल; तपास सुरु

लैंगिक संबंध ठेवल्यानंतर कशी आणि किती दिवसात गर्भधारणा होते ? जाणून घ्या

ब्लॅक, व्हाईट फंगसनंतर भारतात अ‍ॅस्परगिलोसिसची प्रकरणे आली समोर; जाणून घ्या लक्षणं, कारणे आणि बचावाचे उपाय

शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ पाटील यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘… तो Video 2 वर्षांपूर्वीचा, भाजपाने घरगुती वादाचा गैरफायदा घेऊ नये’