शेतकऱ्यांना जगातले कोणतेच सरकार रोखू शकत नाही, मोदी सरकारला ऐकावेच लागेल : राहुल गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदीनी (Prime Minister Narendra Modi) लक्षात घ्यायला हवे जेव्हा अहंकाराचा सत्याशी सामना होतो, तेव्हा अहंकाराचाच पराभव होतो. सत्याच्या या लढाईत उतरलेल्या शेतकऱ्यांना जगातील कोणतेच सरकार रोखू शकत (just-beginning-no-one-can-stop-farmers-rahul-gandhi-warns-narendra-modi) नाही. मोदी सरकारला शेतकऱ्यांचे ऐकावेच लागेल आणि काळे कायदे मागे घ्यावेच लागतील. ही तर फक्त सुरुवात आहे, असे ट्विट कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी धोरणांच्या विरोधात ‘चलो दिल्ली’ आंदोलनात सहभागी झालेल्या पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवरच रोखण्यात आले. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पाण्याचे फवारे आणि अश्रू धुराचाराही वापर करण्यात येत आहे. तरीही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. आंदोलक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.

दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांचा लोंढा वाढतच असल्याने दिल्ली पोलिसांनी राजधानीतील स्टेडियमचे रूपांतर तात्पुरत्या तुरुंगात करण्याची परवानगी मागितली होती. जेणेकरून या शेतकऱ्यांना अटक करता येईल. पण दिल्ली सरकारने पोलिसांची ही मागणी फेटाळून लावली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला हव्यात. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. शेतकऱ्यांना तुरुंगात टाकण्याचे पाप आम्ही करू शकत नाही, असे दिल्ली सरकारचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले आहे.

पंजाबमधून निघालेले शेतकरी हरियाणातून दिल्लीच्या दिशेने कूच करण्यासाठी निघाले होते. शुक्रवारी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेत प्रवेश केला आहे. दिल्ली पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये सिंधू सीमेवर झटापट झाली. शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्याचाही वापर केला. या सगळ्याला न जुमानता शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत.

You might also like