क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर ! ‘या’ गोलंदाजानं केलं भारतीय संघात पुनरागमन

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा जलदगती गोलंदाज म्हणून ओळख मिळवलेल्या आणि फलंदाजांवर योर्करची बरसात करणाऱ्या जसप्रित बुमराचे पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलियाच्या तीन वनडे सामन्यांसाठी सोमवारी संघाची घोषणा करण्यात आली. यामध्ये शिखर धवन आणि बुमराने संघात स्थान मिळवण्यात यश प्राप्त केले आहे. तर रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीला टी २० सामन्यांतून विश्रांती देण्यात आली आहे.

शिखर धवन ऑगस्ट महिन्यात दुखापत झाल्याने अनेक दिवसांपासून मैदानावर उतरलेला नव्हता आता त्याचेही पुनरागमन होणार आहे. बुमरानेही दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपूर्वी माघार घेतली होती आणि तो उपचारासाठी लंडनला गेला होता. मात्र आता दोघाच्याही पुनरागमनाने संघाला बळकटी मिळणार आहे.

2019 या कॅलेंडर वर्षात वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत रोहित शर्मा 1490 धावांसह आघाडीवर आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतही त्यानं पाच शतकं झळकावली होती. ट्वेंटी-20तही त्यानं समाधानकारक कामगिरी केली आहे. रोहित एक वर्ष सातत्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे आणि त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. 2019 वर्ष रोहित शर्माने चांगलेच गाजवले होते.

श्रीलंकेशी होणार सामना
2020 च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवण्यात येईल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेचे वेळापत्रक
14 जानेवारी – मुंबई
17 जानेवारी – राजकोट
19 जानेवारी – बंगळुरू

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/