‘या’ व्हायरसपासून मोबाईल आणि लॅपटॉपला कसे वाचवाल ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुमचा लॅपटॉप असो किंवा मोबाईल या दोन्ही डिव्हाईस ला व्हायरस तर लागला नाही ना ? अशी शंकेची पाल मनात नेहमी चुकचुकते. चुकून आपल्या मोबईल किंवा लॅपटॉप मध्ये मालवेअर, स्पायवेअर चुकून इन्स्टॉल तर झाले नाही ना? म्हणून विविध व्हायरस ,मालवेअर स्पायवेअर विषयीची माहिती आज आपण जाणून घेऊया.

वायरस कसा पसरतो ?

एखाद्या सॉफ्टवेअर, प्रोग्रॅम किंवा एक्सटर्नल डिव्हाइसने वायरस कम्प्युटर किंवा मोबाइलफोनमध्ये येऊ शकतो. त्यानंतर वायरस इतर फाइल्समध्ये पसरतो आणि अजाणतेपणे तो शेअर केलेल्या फाइल्सने अन्य मोबाइल आणि कम्पुटरमध्येही पसरू शकतो.

अ‍ॅप्लिकेशनमधून येणारे मालवेअर

मालवेअर हेसुद्धा एखाद्या अ‍ॅप्लिकेशनमधून फोन आणि कम्प्युटरवर इन्स्टॉल होतं. बहुतेक वेळा एखाद्या अ‍ॅप्लिकेशनची फसवी कॉपी बनवून हे केलं जातं. त्यानंतर फोन किंवा कम्प्युटरमधील डेटा लीक व्हायची शक्यता असते.

स्पायवेअर

स्पायवेअर हे एखाद्या अ‍ॅप्लिकेशन बरोबर नकळत आपल्या फोन किंवा कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल होतं. याचा मुख्यत: वापर हा पासवर्ड मिळवण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे याने फोन किंवा कम्प्युटरचे ठरावीक फिचर्स जसे की, वेब कॅमेरासुद्धा नियंत्रित करता येऊ शकतो.

अशी घ्या काळजी

कम्प्युटर किंवा मोबाइलमध्ये कोणतंही अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल करण्याआधी ते सुरक्षित आहे की नाही याची खात्री करावी. अ‍ॅप स्टोअर किंवा गुगल प्ले स्टोअर वरूनच वेरिफाइड अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करावं. अ‍ॅप्लिकेशन वापरताना येणाऱ्या जाहिरातींवर क्लिक करणं टाळा. एक्स्टर्नल डिव्हाइस वरून सॉफ्टवेअर किंवा अॅप्लिकेशन्स इन्स्टॉल करू नये. अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल करताना आणि वापरायच्या आधी आपली माहिती देताना ती कुठे वापरली जाणार आहे, हे नीट बघून संमती दर्शवावी.