‘वाहन’ पकडल्यास फक्त 100 रुपये द्या आणि वाचवा भरमसाठ ‘दंड’, करावं लागेल फक्त एवढंच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात 1 सप्टेंबरपासून मोटर वाहन कायदा लागू झाल्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भरमसाठ दंड आकारल्याच्या घटना घडल्या. परंतू अशी एक पद्धत आहे ज्या माध्यमातून तुम्ही 100 रुपये देऊन भरमसाठ दंडातून वाचू शकतात. काय आहे हा नियम?

तुमच्याकडे विम्याचे कागदपत्र, वाहन परवाना, नोंदणी प्रमाणपत्र किंवा इतर महत्वाची कागदपत्रे नसतील तर या परिस्थितीत तुम्ही 100 रुपये देऊन वाचू शकतात. रिपोर्टनुसार 100 रुपये देऊन वाचण्याचा नियमात काही अटी देखील आहेत. जर तुमच्याकडे कागदपत्र नसतील तर तुम्ही 15 दिवसात तुमच्या संबंधित प्लॅनिंग ब्रांचला सर्व कागदपत्र दाखवून चलन रद्द करु शकतात आणि त्यासाठी तुम्हाला फक्त 100 रुपये द्यावे लागतील.

कसा माफ होईल दंड –
दंड तेव्हाच माफ होईल जेव्हा तुम्ही तुमच्या जवळच्या प्लॅनिंग ब्रांचमध्ये जाऊन कागदपत्रांची तपासणी करु शकतात. 15 दिवसाचा हा महत्वाचा नियम तेव्हा कामी येईल जेव्हा तुम्ही सर्व कागदपत्र दाखवाल. त्यानंंतर तुमचे चलन रद्द होईल. यानंतर तुमचे चलन 100 रुपये देऊन रद्द करण्यात येईल.

एवढा असेल दंड –
नव्या कायद्यानुसार वाहनांचा अनाधिकृत वापर केल्यास 5,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. दारू पिऊन गाडी चालवली तर 6 महिन्याचा तुरुंगवास आणि 10,000 रुपयांच्या दंड असेल. वेगवाने वाहन चालवल्यास LMV साठी 1000 रुपये तर मिडिअम पॅसेंजर व्हेईकलसाठी 2000 रुपये दंड असेल.

You might also like