केवळ गाडीत बसून हात उंचावला म्हणजे प्रचार होत नाही : मनेका गांधी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीतून भाजपच्या स्मृती इराणी यांनी पराभव केल्यानंतर भाजप नेत्या मनेका गांधी यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राजकारण हा काही पोरासोरांचा खेळ नाही, केवळ गाडीत बसून हात उंचावला म्हणजे निवडणूक प्रचार होत नाही अशा शब्दांत मनेका गांधी यांनी राहुल यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मनेका गांधी यांनी म्हंटले आहे की, निवडणूकीच्या प्रचारात एकही योग्य मुद्दा उचलला नाही. केवळ गाडीत बसून हात उंचावला म्हणजे निवडणूक प्रचार होत नाही, राजकारण करायचं तर व्यवस्थित आणि गंभीरपणे करा,

असा सल्ला मनेका गांधी यांनी राहुल यांना दिला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना मनेका यांनी ही टीका केली आहे. मनेका गांधी या उत्तर प्रदेशातील सुल्तानपूर मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांनी बसपाचे उमेदवार चंद्रभद्र उर्फ सोनू सिंह यांचा १४ हजार मतांनी पराभव केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like