पाठीला मॉडेल्सप्रमाणं परफेक्ट ‘शेप’ देण्यासाठी खर्च करा फक्त 20 मिनिटे ! जाणून घ्या ‘हे’ 5 सोपे स्ट्रेच

पोलिसनामा ऑनलाइन – जर तुम्हाला तुमच्या पाठील परफेक्ट शेप द्यायचा असेल तर काही स्ट्रेचिंग पोज करूनही तुम्ही परफेक्ट शेप देऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 20 मिनिटे खर्च करावे लागणार आहेत. याशिवाय स्ट्रेचिंगमुळं स्नायू लवचिक आणि मजबूत होतात. आज आपण अशा 5 स्ट्रेचिंग एक्सरसाईज पाहणार आहोत ज्या तुम्ही रोज करायला हव्यात ज्यामुळं तुम्हाला एक सुदंर बॅक मिळेल.

1) सुपरमॅन – एखाद्या मॅटवर पालथं झोपा. आपले हाथ पुढं पसरवा. आता पोट जमिनीपासून वर उचला. आता सुपरमॅन सारखी पोज बनवण्याचा प्रयत्न करा. आता काही सेकंद होल्ड करा. आता पुन्हा नॉर्मल पोजिशनला या. याचे 10 रेपिटीशनचे 3 सेट करा.

2) कॅट स्ट्रेच – या स्ट्रेचसाठी जमिनीवर गुडघ्यावर उभं रहा. आता बॅकबोनला बाहेरच्या दिशेनं मोल्ड करा आणि धनुष्यासारखा आकार बनवा. आता 3 ते 5 सेकंद होल्ड करा. आता पुन्हा बॅकबोनला आत मोल्ड करा. आता पुन्हा 3 ते 5 सेकंद होल्ड करा. आता नॉर्मल पोजिशनला या. या स्ट्रेचचे 5 सेट्स करा. हा स्ट्रेच बॅकबोनला फ्लेक्सिबल बनवतो. पाठदुखी असेल तर यामुळं आराम मिळतो.

3) ब्रिज पोज म्हणजेच सेतुबंध आसन – या स्ट्रेच साठी आपल्या पाठीवर झोपा. आता गुडघ्यात वाका आणि हिप्सच्या जवळ आणा. दोन्ही हात साईडला ठेवा. आता हळूहळू लोअर बॅक आणि हिप्सला वर उचला. मानेला झटका लागणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला ग्लूट्सपला स्ट्रेस वाटायला हवा. आता 30 सेकंद ते एक मिनिटांसाठी होल्ड करा आणि पुन्हा रिलॅक्स व्हा.

हा स्ट्रेच 5 वेळा करायला हवा. यामुळं लोअर बॅकची फ्लेक्सिबिलिटी वाढते आणि हिप्सचा शेपही इम्प्रुव होतो. यामुळं बॅकचा लुकही कमाल दिसतो. यामुळं पोश्चरही सुधारतं आणि पाठ आकडत असेल तर आराम मिळतो.

4) डॉग पोज म्हणजेच अधोमुख श्वानासन – जमीनीकडे तोंड करून हात जमिनीवर ठेवून डॉगप्रमाणे पोज करा. पाय गुडघ्यात वाकवू नका. हातांवर आणि पायांवर शरीराचा भर सोडा. हॅमस्ट्रींग आणि ग्लूट्सवर प्रेशर जाणवायला हवा. 5 सेकंद होल्ड करा नंतर शरीर पुढं न्या. या पोजमध्ये लोअर बॅक स्ट्रेच व्हायला हवी. अॅब्डोमेन मसल्सवर प्रेशर जाणवायला हवा. दोन्ही पोज मिळून एक स्ट्रेच झाला. असे 10 रेपिटीशनचे 2-3 सेट्स करा. हळूहळू संख्या वाढत न्या. हा स्ट्रेच पूर्ण शरीराच्या मसल्सला टारगेट करतो.

5) कोबरा पोज – पाठीसाठी हा स्ट्रेच खूप गरजेचा आहे. यासाठी मॅटवर पाठीवर झोपा. दोन्ही हात खांद्याजवळ ठेवा. हातांवर जोर देत अप्पर बॅक वर उचला आणि लोअर बॅक स्ट्रेच करा. पाय मॅटवरच राहायला हवेत. मान आणि डोकं समोर ठेवा आणि दीर्घ श्वास घेत रहा. या पोजमध्ये 1 मिनिटासाठी होल्ड करा आणि नंतर रिलॅक्स करा.

किमान 5 वेळा हा स्ट्रेच करा. हा स्ट्रेच पाठ आणि सर्व मसल्सला स्ट्रेच करतो. यामुळं पोश्चरमध्ये सुधारणा होते आणि पाठीलाही शेप मिळतो. याशिवाय यामुळं लोअर बॅकपेनमध्येही आराम मिळतो.

वरील पाचही स्ट्रेच आपल्या रूटीनमध्ये समाविष्ट करा. यामुळं पाठीचं सौंदर्य वाढेल.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत.