…जेव्हा न्यायाधीशांनीच वकिलांकडे मागितली ‘दंडवत’ माफी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर एका वरिष्ठ वकिलाला न्यायालयाच्या बाहेर जावे लागले होते. यानंतर दोन दिवसांनी न्यामूर्ती अरुण मिश्रा यांनी गुरुवारी माफी मागितली. त्यांनी सांगितले की, जर त्यांच्या बोलण्याने कोणाला वाईट वाटले असेल तर ते बारच्या प्रत्येक सदस्याची दंडवत माफी मागत आहेत. त्याचप्रमाणे मी जर माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला, पशु पक्षांना, झाडांना देखील दुःख पोहचवले असेल तर मी त्यांची माफी मागतो असे न्यायाधीश मिश्रा यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयातील तिसरे वरिष्ठ न्यायमूर्ती मिश्रा यांनी वरिष्ठ वकिलांच्या समूहाला सांगितले की, माझ्या काही म्हणण्याचा चुकीचा हेतू नव्हता. जर माझ्याकडून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो. तसेच ते म्हणाले की, गोपाळ शंकर नारायणन हे एक उत्तम वकील आहेत हा माझा संदेश त्यांच्यापर्यंत नक्की पोहचवा. काही दवसांपूर्वी मिश्रा यांच्या निदर्शनाखाली एका जमिनीबाबतची सुनावणी सुरु होती.

वरिष्ठ वकील गोपाळ शंकर आपली बाजू मांडत होते. त्यावेळी न्यायधीश मिश्रा यांनी वकिलांना आपली बाजू पुन्हा मांडण्यास सांगितली. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर मिश्रा यांनी अवमानाच्या कारवाईचा इशारा दिला म्हणून नारायणन न्यायालयाच्या बाहेर निघून गेले. यानंतर वरिष्ठ वकिलांनी आणि बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी न्यायमूर्ती मिश्रा यांना वकीलांशी बोलताना थोडा संयम बाळगण्यासाठी विनंती केली होती.

वरिष्ठ वकिलांनी विनम्र आणि सहनशील असावे
कपिल सिब्बल, मुकुल रोहतगी, अभिषेक मनु सिंघवी, दुष्यंत दवे, शेखर नाफडे समवेत अन्य वरिष्ठ वकिलांनी न्यायमूर्ती मिश्रा यांना बारच्या सदस्यांसोबत विनम्र आणि सहनशील राहण्याचा आग्रह केला होता. त्यांनी सांगितले की, बार आणि खंडपीठ या दोघांचेही हे कर्तव्य आहे की, त्यांनी न्यायालयाचा मान कायम ठेवावा आणि परस्परांचा सन्मान ठेवावा. रोहतगी यांनी सांगितले की, अनेक युवा वकील या न्यायालयात येण्यासाठी घाबरतात.

कधी कधी रागात अशा गोष्टी होतात : न्यायमूर्ती शाह
न्यायमूर्ती मिश्रा यांच्यासोबत असलेल्या एमआर शाह यांनी सांगितले की, कधी कधी रागात अशा गोष्टी होतात. त्यांनतर मिश्रा यांनी सांगितले, दुसऱ्या एखाद्या न्यायाधिशापेक्षा त्यांचे बारशी चांगले संबंध आहेत, तसेच मी बारचा आईप्रमाणे आदर करतो. तसेच मला कोना बाबतही तक्रार नसल्याचे त्यांनी सांगितले.

अहंकाराचा वाईट परिणाम
न्यायमूर्ती मिश्रा यांनी सांगितले की, अहंकार या महान संस्थेला नष्ट करत चालला आहे. त्यामुळे याचे रक्षण करणे हे बारचे कर्तव्य आहे. तसेच सुनवाई दरम्यान वकिलांनी कोणावरही वयक्तिक टिपण्णी करू नहे. मी नेहमीच बारशी जोडलेली राहिलो आहे. मी माझ्या न्यायाधीशाच्या करिअरमध्ये कोणत्याच वकिलांविरोधात अवमानाची कारवाई केलेली नाही. अहंकार कोणालाच चांगला नाही परंतु कधी कधी वकिलांकडून त्याचे प्रदर्शन केले जाते. जर माझ्याकडून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी हात जोडून माफी मागतो असे न्यायमूर्ती अरुण मिश्रा यावेळी म्हणाले.

Visit : Policenama.com