शाहरुख खानने सूचवलेला तोडगा; ‘अयोध्या मंदिराची पायाभरणी मुस्लिमांनी, तर मशिदीची हिंदूंनी करावी…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे हे सेवानिवृत्त झाले आहेत. बोबडे यांच्या निरोपासमारंभी सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष/वरिष्ठ अधिवक्ता विक्रम सिंह यांनी एक भाष्य करतेवेळी अयोध्या जमीन वादावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी म्हणून प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानला सहभागी करावे असते न्या. बोबडे यांचं मत होत. असे विक्रम सिह म्हणाले. याबाबत प्रथमच सार्वजनिक पद्धतीने स्पष्ट केले आहे.

२०१९ च्या मार्चमध्ये अयोध्या वादावर तोडगा काढण्यासाठी माजी न्या. रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली ५ न्यायाधीशाच्या संसदीय घटनापीठावर समिती स्थापन करण्यात आली होती. या दरम्यान शरद बोबडे यांनी अभिनेता शाहरुख खानचा समितीत सहभाग असावा असे त्यांनी म्हटले होते. यावरून विक्रम सिह यांनी म्हटले की, अभिनेता खान हा देखील तयार होता. परंतु, या गोष्टीवरून अखेर निर्वाळा न झाल्याने ते तसेच राहिले. पुढे सिह म्हणाले, न्या. बोबडे हे ज्यावेळी अयोध्या सुनावणीच्या वेळी प्रारंभी टप्प्यात सहभागी झाले तेव्हा समस्येचे सामधान हे मध्यस्थींच्या माध्यमातून कढता येईल यावर त्यांचा अधिक विश्वास होता, असे ते म्हणाले.

या सर्व प्रकरणावरून अभिनेता शाहरुख खान हा तयार झाला होता. हे एक सर्व बोबडे यांचं गुपित होतं. बोबडे यांनी मला विचारणा केल्यावर, मी शाहरुख खान सोबत याबाबत चर्चा केली होती. तो यासाठी तयारही झाला होता, असं सिंह यांनी म्हटले. तर मंदिराची पायाभरणी मुस्लिमांकडून केली जावी, आणि मशिदीची पायाभरणी हिंदूंनी ठेवावी असे शाहरुख खानने म्हटले होते. पण, शाहरुखने मध्यस्थी करण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. म्हणून याबाबत पुढं काहीही यावर विचार केला नाही.

परंतु, सांप्रदायिक तणाव मध्यस्थीच्या मार्फत सोडवण्याबाबत त्याने व्यक्त केलेली इच्छा ही कौतुकास्पद होती असे विक्रम सिह यांनी म्हटलं. सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या मध्यस्थी समितीमध्ये तत्कालीन न्या. F. M. I कलीफुल्ला, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रवि शंकर आणि वरिष्ठ विधिज्ञ श्रीराम पंचू यांचा यामध्ये समावेश होता. या कार्यक्रमा दरम्यान, मी प्रसन्न मानाने, सद्भभावनेने आणि खूप चांगल्या आठवणी बरोबर घेऊन सुप्रीम कोर्टाचा निरोप घेत आहे. तसेच मी येथे माझी सर्वोत्तम कामगिरी करु शकलो याचा मला आनंद आहे, असे बोबडे म्हणाले.