जाणून घ्या महाराष्ट्राचे सुपूत्र न्यायाधीश बोबडेंच्याबद्दल, होऊ शकतात पुढचे CJI, अयोध्या बेंचमध्ये होते सहभागी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या सरन्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य सरन्यायाधीश रंजन गोगोई पुढील महिन्यात 17 तारखेला निवृत्त होणार आहे. आता त्यांनी केंद्र सरकारला पुढील सरन्यायाधीशांचे नाव सुचवले आहे. सरन्यायाधीशांकडून न्यायाधीश एस.ए. बोबडे यांचे नाव सुचवण्यात आले आहे. त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही की ते देशाचे पुढील सरन्यायाधीश असतील.

कोण आहेत न्यायाधीश एस. ए. बोबडे –
सध्या न्यायाधीश बोबडे राम जन्मभूमी बाबरी मस्जिद प्रकरणी सुनावणी करणाऱ्या पीठात आहेत. याशिवाय अनेक मोठ्या निर्णयात सहभागी आहेत.
– जस्टिस अरविंद शरद बोबडे यांचा जन्म 24 एप्रिल 1956 मध्ये महाराष्ट्रात नागपूरात झाला.
– जस्टिस अरविंद शरद बोबडे यांनी नागपूर विश्वविद्यालयातून बी. ए आणि एल. एल. बी डिग्री घेतली आहे.
– 1978 मध्ये जस्टिस बोबडे यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रात सहभाग घेतला होता.
– त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात नागपूर खंडपीठमध्ये कायद्याची प्रॅक्टिस केली, 1998 मध्ये ते वरिष्ठ वकील बनले.
– 2000 साली त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अ‍ॅडिशनल न्यायाधीश म्हणून पदभार स्विकारला. यानंतर ते मध्यप्रदेशच्या उच्च न्यायलयाचे चीफ जस्टिस बनले.
– 2013 साली त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा कार्यभार स्विकारला, जस्टिस एस. ए. बोबडे 23 एप्रिल 2021 रोजी निवृत्त होतील.
– 18 नोव्हेंबरला जस्टिस बोबडे सरन्यायाधीश पदाची शपथ घेऊ शकतात, सध्या केंद्र सरकारच्या मंजूरीची प्रक्रिया सुरु आहे.

कोणकोणत्या निर्णयात सहभागी होते एस. ए. बोबडे –
1) सर्वोच्च न्यायालयाद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयात जस्टिस बोबडे यांचा समावेश होता. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी एक टिप्पणी केली होती की आधार कार्ड शिवाय कोणताही भारतीय त्याच्या मुलभूत हक्कापासून वंचित राहता कामा नये. या पीठात जस्टिस बोबडे, जस्टिस चेलमेश्वर आणि जस्टिस नागप्पन यांचा समावेश होता.

2) मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या विरोधात जे लैंगिक अपराधाचे प्रकरण समोर आले होते त्याचा तपास सर्वोच्च न्यायालयाचे तीन न्यायाधीश करत होते. या पीठात जस्टिस एस ए बोबडे, एन वी रमन आणि इंदिरा बनर्जी यांचा समावेश होता.

3) नोव्हेंबर 2016 मध्ये तीन मुलांद्वारे दाखल याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली NCR मध्ये फटाक्यांच्या विक्रीवर रोख लावली होती. या पीठात तत्कालीन सरन्यायाधीस टी एस ठाकूर होते, जस्टिस ए. के. सीकरी आणि जस्टिस एस. ए. बोबडे यांच्या देखील या पीठात समावेश होता.

मागील 40 दिवसांपासून रामजन्मभूमी – बाबरी मस्जिद या प्रकरणी रोज सुनावणी सुरु होती. त्याच्या पीठात जस्टिस एस. ए. बोबडे यांचा देखील समावेश होता. पाच न्यायाधीशांच्या या पीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई, जस्टिस एस. ए. बोबडे, जस्टिस चंद्रचूड, जस्टिस अशोक भूषण आणि जस्टिस नजीर यांचा समावेश होता. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आता याचा निर्णय येणे बाकी आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी