अयोध्या निकाल : न्यायाधीश एस. अब्दुल नझीर यांना Z ‘कॅटेगरी’ची सुरक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर आणि त्यांच्या कुटुंबीयांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायमूर्ती नझीर हे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात होते आणि त्यांनी अयोध्याबाबत नुकताच निर्णय दिला आहे. पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया यांच्या धमकीनंतर त्यांना संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अब्दुल नझीर यांना मिळालेल्या धमकीनंतर गृह मंत्रालयाने स्थानिक यंत्रणांना सूचना देत परिवाराच्या सुरक्षेबाबत विचार करून हा निर्णय घेतला आहे.

सुरक्षेसाठी तैनात झाले सीआरपीएफ आणि पोलीस दल –

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दल आणि स्थानिक पोलीसांनी या आदेशाचे तत्काळ पालन करत न्यायमूर्ती नझीर आणि त्यांच्या परिवाराला कर्नाटक आणि देशाच्या अन्य भागांमध्ये सुरक्षा पुरवण्यासाठी तत्परता दाखवली आहे.

न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांना कर्नाटक कोर्टासह बेंगळुरू, मंगळुरू आणि राज्यातील इतर भागांत सुरक्षा व्यवस्था देण्यात येणार आहे. तसेच, बंगळुरु आणि मंगळुरूमध्ये राहणाऱ्या त्याच्या कुटुंबालाही हीच सुरक्षा दिली जाईल.

राम मंदिर आणि तीन तलाकबाबत दिला होता निर्णय
शनिवारी सुप्रीम कोर्टाने आपल्या ऐतिहासिक निर्णयामध्ये वादग्रस्त ठिकाण असलेल्या राम मंदिराच्या बांधकामाचा ट्रस्टद्वारे मार्ग मोकळा केला आणि अयोध्येतील मशिदीच्या बांधकामासाठी पाच एकर पर्यायी जागा देण्यास सांगितले. पाच न्यायाधीशांच्या घटना खंडपीठामध्ये न्यायमूर्ती एस.ए. बोबडे, न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस अब्दुल नझीर यांचा समावेश होता.

आयोध्या निकलाव्यतिरिक्त अब्दुल नझीर हे त्या खंडपीठाचा देखील भाग होते. ज्यांनी 2017 मध्ये तीन तलाक बाबत सुद्धा निर्णय दिला. नजीर यांनी एसडीएम लॉ कॉलेज कोडियालबेल मंगळुरु या ठिकाणी आपले शिक्षण पूर्ण केले होते. तसेच कर्नाटकच्या उच्च न्यायालयातून 18 फेब्रुवारी 1983 पासून त्यांनी एका वकिलाच्या भूमिकेतून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. न्यायमूर्ती नझीर यांची मे 2003 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती.

Visit : Policenama.com