‘तो’ फोटो इंस्टाग्रामवर शेअर केल्याने जस्टिन बीबरविरोधात FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – फेमस सिंगर जस्टीन बीबरने 13 मार्च रोजी इंस्टाग्रामवरून आपल्या फ्रेंडसोबत एक फोटो शेअर केला होता. यानंतर आता इंटरनॅशनल फोटोग्राफर रॉबर्ट बरबराने या फोटोंसाठी जस्टिन बीबरवर कॉपीराईटचं उल्लंघन केल्याबद्दल लीगल अ‍ॅक्शन घेतली आहे. 13 मार्च रोजी जस्टिन बीबरने मित्र रिच विल्कर्सन सोबत इंस्टावर फोटो शेअर केला होता.

एका इंग्रजी वृत्तानुसार, हे सगळे फोटो रॉबर्ट बरबराच्या नावावर रजिस्टर्ड आहेत. कागदपत्रांमध्ये म्हटलं आहे की, या फोटोंवर रॉबर्ट बरबराचा मालकी हक्क आहे. अशात आता जस्टिन बीबर फोटोंच्या बेकायदेशीर प्रतींसाठी फसला आहे. त्याने हे सगळे फोटो पब्लिकही केले आहेत.

रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की, कोर्टाच्या दस्तऐवजांनुसार, जस्टिन बीबरने फोटोग्राफरकडून फोटो शेअर करण्यासाठी परवानगी घेतली नव्हती. याशिवाय त्याने त्याने रॉबर्ट बरबराकडून फोटो पोस्ट करण्यासाठी लायसन्सही घेतलं नव्हतं.

https://www.instagram.com/p/B3k-30nna-U/

 

Visit : policenama.com