पॉप स्टार जस्टीन बीबरच्या चाहत्यांना मोठा धक्का ! ‘या’ गंभीर आजाराशी ‘झुंज’ देतोय गायक

वृत्त संस्था – पॉप स्टार जस्टीन बीबर हा लुक आणि पर्सनल लाइफमुळे नेहमीच चर्चेत असतो. परंतु, यावेळेस जस्टीन आपल्या आरोग्याशी संबंधीत विषयामुळे चर्चेत आहे. नुकताच त्याने आपल्या आजाराविषयी सोशल मीडियावर खुलासा केला आहे. त्याच्या आजाराची बातमी समजल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

जस्टीन बीबर कोणत्याही सामान्य आजाराने नव्हे, तर लाइम डिसीज या असाध्य आणि दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. जस्टीनने इन्स्टाग्रामवर हा खुलासा करताना म्हटले आहे की, अनेक लोक असे म्हणत आहेत की जस्टीन बीबर खराब दिसत आहे, त्यांना हे दिसत नाही की मी आजारी आहे. मला लाइम डिसीज हा आजार झाल्याचे निदान झाले आहे. एवढेच नव्हे, तर बल्कक्रॉनिक मोनोची सुद्धा सीरियस केस होती, ज्यामुळे माझी त्वचा, डोके, शरीरातील उर्जा आणि संपूर्ण आरोग्यावर परिणाम झाला.

त्याने सांगितले की, हे सर्व मी तुम्हाला लवकरच एका डॉक्यूमेंट्री सीरीजमध्ये समजावून सांगेन. जी मी लवकरच यूट्यूबवर अपलोड करणार आहे. यामुळे तुम्हालाही समजेल की मी कशासोबत लढत आहे. जस्टीनने म्हटले आहे की, मागील काही वर्ष माझ्यासाठी खुपच अवघड होती. परंतु, लवकरच एक योग्य उपचार घेऊन मी या असाध्य रोगातून बरा होईन. यापासून सुटका झाल्यानंतर मी लवकरच परत येईन.

मागील वर्षी आला होता मुंबईत
जस्टीन बीबर मागच्या वर्षी मे मध्ये वर्ल्ड टूर प्रोग्रामअंतर्गत भारतात आला होता. त्याने नवी मुंबईतील डीवाई पाटील स्टेडियममध्ये कॉन्सर्ट परफॉर्म केला होता. या कॉन्सर्टमध्ये हजारो चाहते सहभागी झाले होते. यावेळी जस्टीनला सलमान खानचा बॉडीगार्ड शेराकडून सुरक्षा देण्यात आली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like