अल्पवयीन मुलांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, दोन जखमी

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाईन

अल्पवयीन मुलांनी तिघांवर केलेल्या चाकू हल्ल्यात एकाच जागीच मृत्यू झा असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. उल्हासनगरमधील सी ब्लॉक परिसरात रविवारी रात्री ८ वाजता ही घटना घडली. महाविद्यालयातील भांडणातून हा प्रकार घडला असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eafad83d-cab1-11e8-b054-cf567c69f53f’]

विशाल मिश्रा असे मृत्यु पावलेल्या मुलाचे नाव आहे तर, आकाश व सनी झा हे दोघे गंभीर जखमी आहेत. खुनी हल्ला करणारे तिघेही अल्पवयीन त्रिकुट दुलानी कॉलेज परिसरात राहणारे आहेत. उल्हासनगर कॅम्प नं. ३, सी ब्लॉक परिसरातून रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आकाश झा, सनी झा व विशाल मिश्रा हे तिघे जण जात होते. त्यावेळी या तिघा अल्पवयीन मुलांनी चाकूने त्यांच्यावर हल्ला केला. आकाश व सनी झा यांच्या पाठीवर, गालावर चाकूने वार करून जखमी केले. तर विशाल मिश्रा याच्या छातीवर चाकूने वार केल्याने, तो रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला, त्यातच त्याचा मृत्यु झाला. तर गंभीर जखमी झालेले आकाश व सनी झा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खूनी हल्ला करून अल्पवयीन त्रिकुट फरार झाले.

[amazon_link asins=’B01JGQ0K5S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fc075108-cab1-11e8-97c8-27d5f6f0d4d1′]

पोलिसांना खूनी हल्ल्याची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी घाव घेतली. विशालचा मृतदेह ताब्यात घेऊन, उत्तरतपासणी साठी रुग्णालयात पाठविण्यात आला. विशालचा भाऊ अभिषेक मिश्रा यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलिसांनी खूनी हल्ला करणाऱ्या अल्पवयीन खूनी त्रिकुटा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉलेज परिसरात यापूर्वी झालेल्या वादावादीतून या तिघांनी संगनमत करुन हा हल्ला केला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तिघेही पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यांना जाब विचारणाऱ्या वडिलांवर हल्ला