गौरी आगमनासाठी मुहूर्त व पूजनाची पद्धत, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गौरी आगमन म्हणजे सासरी गेलेल्या मुलीला माहेरी येण्याचा हक्काचा दिवस. गणपतीबरोबरच महालक्ष्मी किंवा गौरी आगमन आणि दुसऱ्या दिवशी पूजन हा मोठा सोहळा महाराष्ट्रातल्या अनेक घरांमध्ये होत असतो. काही ठिकाणी पूर्णाकृती तर काही ठिकाणी खड्याच्या गौरी बसवण्याची पद्धत आहे. तीन दिवस साजरा केल्या जाणार्‍या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. दुसर्‍या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसर्‍या दिवशी विसर्जन करतात.

Related image

गौरी पूजनाचा मुहूर्त –

आज दिवसभर अनुराधा नक्षत्र असल्यामुळं दिवसभरात कधीही गौरी आणता येतील. गौरींचं पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर केलं जातं. उद्या (शुक्रवार, 6 सप्टेंबर) रोजी दिवसभर ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळं ज्येष्ठा गौरींचं पूजन दिवसभर करता येईल तर शनिवारी म्हणजे 7 सप्टेंबरला दिवसभर मूळ नक्षत्र असल्यामुळं दिवसभरात कधीही ज्येष्ठा गौरींचं विसर्जन करता येईल.

Related image

गौरी पूजनाची पद्धत –

गौरीपूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये परंपरेनुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी धातूचा मुखवटा बसवतात.

रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवितात. गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढतात. महापूजनात पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळवतात. हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात.

Image result for gauri pujan hd

गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुराणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या, 16 पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो.

तिसर्‍या दिवशी खीर-कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात. परंपरेनुसार मुखवटे हालवण्यात येतात. नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.

आरोग्यविषयक वृत्त –