योगदिनासाठी जगातील सर्वात ‘बुटक्या’ ज्योतीचाही सहभाग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जागतिक योग दिनाच्या पूर्वसंध्येला एक सरावाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र ज्याची नोंद जगातील सर्वात कमी उंचीच्या असलेल्या एका व्यक्तीच्या सहभागामुळे ! जगातील सर्वात कमी उंचीच्या असलेल्या नागपूरमधील रहिवासी ज्योती अमगे यांच्या योग सरावाच्या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे योग दिनाच्या कार्यक्रमात ती सहभागी होणार आहे.

भारतात योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच अलीकडे योगा, विविध आसने याबाबत जनजागृती करण्यात येत असून विविध वयोगटातील नागरिकांचा योगा करण्याकडे कल दिसत आहे. जागतिक योगा दिनानिमित्त सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. योगा, आसने याबाबत अधिकाअधीक जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक योगादिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने नागपूरमध्ये जगातील सर्वात कमी उंचीची असलेल्या ज्योती अमगे हिने योगाचा सराव केला.

योगा दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या शिबीरात ज्योती सहभाग घेणार आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून ती सराव करत आहे. ज्योतीच्या नावावर सर्वात कमी उंचीच्या महिलेचा रेकॉर्ड आहे. ज्योतीची उंची २ फूट ६ इंच एवढी आहे. तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ज्योतीचे नाव झळकले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन