Jyotiraditya Scindia | केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले – ‘मराठा म्हणून एकनाथ शिंदे…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Jyotiraditya Scindia | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीमुळे आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार व्हायला लागले. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. तर मुख्यमंत्रीपदी म्हणून जोरदार चर्चेत असणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पक्षश्रेष्टींच्या आदेशाप्रमाणे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे राजकीय घडामोडीत नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. दरम्यान, यावर बोलताना केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या विधानाची सध्या चर्चा रंगली आहे.

 

“मागील अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या विकासाला महाविकास आघाडीच्या अपवित्र आघाडीमुळे खिळ बसली होती. अशावेळी मराठा म्हणून एकनाथ शिंदेंनी विचारसणीच्या दृष्टीकोनातून योग्य निर्णय घेतला. मला विश्वास आहे की ‘फडणवीस-शिंदे जोडी’ पुन्हा महाराष्ट्रात विकास सुरु करेल.” असं ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी म्हटलं आहे.

 

 

एकनाथ शिंदे हे मराठा असल्याचा उल्लेख करत ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्यास भाजपामधील काही ज्येष्ठ नेत्यांचा विरोध होता. त्यामुळे ब्राह्मण मुख्यमंत्री पुन्हा करू नये, असे मत काही नेत्यांनी अमित शहा (Amit Shah) यांच्याकडे व्यक्त केले होते. शिंदे हे मराठा समाजातील आहेत. त्यामुळे त्यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्याने भाजपमध्ये (BJP) नाराजी असल्याची चर्चा आहे.

या दरम्यान, एकनाथ शिंदेंप्रमाणेच ज्योतिरादित्य शिंदेंनीही आपल्या पक्षाविरोधात बंडखोरी केली होती.
मार्च 2020 साली ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरी करत काँग्रेसमधून (Congress) भाजपामध्ये प्रवेश केला.
यावेळेस शिंदेंबरोबरचे समर्थक आमदारही पक्षातून बाहेर पडल्याने मध्य प्रदेशमधील (MP) कमलनाथ सरकार कोसळलं होतं.
शिंदे गटाच्या समर्थनावर शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) मुख्यमंत्री झाले होते.
मात्र यावेळी शिंदेंनी राज्य सरकारमध्ये कोणतंही पद घेतलं नव्हतं.
दरम्यान त्यानंतर त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली. आणि त्यानंतर थेट केंद्रीय मंत्रीपद दिलं गेलं.

 

Advt.

Web Title :- Jyotiraditya Scindia | BJP leader and union minister jyotiraditya scindia said being a maratha eknath shinde ji took the right decision

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bullet Train | महाराष्ट्रात सरकार बदलल्याने ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पाचा वेग वाढणार, अडथळे होणार दूर

 

Uddhav Thackeray | शिंदेच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचा मोठा निर्णय ! आता शिवसैनिकांना द्यावे लागणार एकनिष्ठतेचं प्रमाणपत्र

 

Maharashtra Rain Update | मुंबईसह परिसरात जोर’धार’ ! आगामी 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

 

Dia Mirza Traditional Look | दिया मिर्झाच्या पारंपारिक लूकनं वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके, पाहा व्हायरल फोटो…