Jyotiraditya Shinde । शपथ घेतल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदेंच्या फेसबुकवरुन मोदींविरोधातील आक्रमक भाषण केलेला कथित Video व्हायरल
मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – मोदीं सरकारच्या मंत्रिमंडळात (Union cabinet expansion) काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) यांची देखील मंत्रीपदी वर्णी लागली आहे. मंत्रीपदी वर्णी लागताच त्याच्या दुसऱ्याच दिवशीच शिंदे (Jyotiraditya Shinde) यांचा फेसबुक (Facebook ) अकाउंट हॅक झाल्याची माहिती समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे. तर कोणी अज्ञात व्यक्तीने रात्री 12.23 वाजता त्यांच्या फेसबुक वॉलवर पंतप्रधान नरेंद्र मोदीं (Narendra Modi) विरोधातील आक्रमक भाषण केलेला कथित व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. jyotiraditya shinde facebook account hacked uploaded old videos against modi
Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हा कथित व्हिडिओ (Video) व्हायरल केला आहे तो व्हिडिओ जेव्हा ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) हे काँग्रेसमध्ये होते तेव्हाच आहे.
मात्र, या प्रसारित झालेल्या वृत्तावरून सायबर टीम सक्रिय झाली आहे.
नंतर, काही मिनिटातच हॅकिंग थांबविण्यात आलं, याबरोबर व्हायरल केलेला जुना व्हिडीओही थांबवण्यात आला आहे.
जेथून शिंदेचं फेसबुक अकाऊंट हॅक केलं होतं, त्याबाबत माहिती समोर आलीय.
2020 मार्चमध्ये ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसला (Congress) रामराम करून भाजपचे (BJP) कमळ हाती घेतले होते.
–
ज्योतिरादित्य शिंदे यांना केंद्रातील नागरी विमान वाहतूक मंत्रीपदी वर्णी लागली आहे. केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रात्री 12.23 वाजता त्यांचं फेसबुक खातं हॅक केलं आहे. करण्यात आलं. हॅकरने (Hacker) त्यांच्या वॉलवर जुने फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केलं आहे. यात असे व्हिडीओ आहेत, ज्यामध्ये ज्योतिरादित्य शिंदेंनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांचा फेसबुक अकाऊंट हॅक (Facebook account hacked) झाल्याच्या वृत्ताने राजकीय वातावरणात चर्चा रंगली आहे. अजूनही ज्योतिरादित्य शिंदेंच्या अकाऊंटवर सायबर टीम लक्ष ठेवून आहे. भोपाळमधील शिंदे समर्थक नेते कृष्णा घाटगे यांनी याला दुजोरा दिला आहे. तातडीने हॅकिंग थांबविण्यात आलं. काही मिनिटाचं जे फोटो आणि व्हिडीओ अपलोड केले होते, ते हटविण्यात आले.
Web Title : jyotiraditya shinde facebook account hacked uploaded old videos against modi
Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | चोरीचे सव्वाशेहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या चोरट्यांना 15 जुलैपर्यंत पोलिस कोठडी
CM Uddhav Thackeray । शिवसेनेचं ‘मिशन महाराष्ट्र’; CM उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना कानमंत्र
Pune Crime News | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्यासह त्याच्या मित्राला सक्तमजुरीची शिक्षा