काँग्रेसला मोठा धक्का ! अध्यक्षपदाच्या ‘रेस’मध्ये असलेल्या नेत्यानेच दिला राजीनामा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनाम्याचे सत्र सुरु झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी घेत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार यावर काही नावांची चर्चा सुरु होती. आता मात्र काँग्रेसला चांगलाच धक्का मिळाला आहे. काँग्रेसच्या नवीन अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याच्याबाबतीत चर्चेत असलेल्या व्यक्तीनेच काँग्रेसला राजीनामा दिला आहे.
Milind Deora quits as Mumbai Congress chief

काँग्रेसचे महासचिव ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पत्कराव्या लागलेल्या पराभवाची जबाबदारी घेत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. परंतू त्यांचा राजीनामा अद्याप पक्षाने स्वीकारला नाही.

लोकसभा निवडणुकांवेळी ज्योतिरादित्य शिंदे यांना पश्चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतू काँग्रेसला तेथे चांगले यश मिळाले नाही. त्यामुळे राहुल गांधींनी जसा पराभवाची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला तसंच ज्योतिरादित्य यांनीही पश्चिम उत्तर प्रदेशमधील पराभवाची जबाबदारी घेत राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य प्रदेशमध्ये गुना लोकसभा मतदार संघ शिंदे घराण्याचा ग़ड मानला जायचा ज्योतिरादित्य शिंदे हे याच मतदार संघातून चार वेळा निवडून आले होते. त्यांचे वडिल माधवराव शिंदे आणि आजी विजयाराजे शिंदे यांनी देखील गुना येथे विजय मिळवला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत ज्योतिरादित्य शिंदेंना येथे पराभवाचा सामना करावा लागला. गुना येथे झालेला पराभव हा राजघराण्याचा पहिलाच पराभव आहे. त्यामुळे हा पराभव त्यांच्या अधिक जिव्हारी लागला आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेसच्या नेत्यांनी देखील आपले राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत काँग्रेसकडे १४० राजीनामे देण्यात आले आहेत. त्यामुळे काँग्रेससमोर एक नाही तर अनेक आव्हाने आहेत.

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी