K Chandrashekar Rao | तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR आणि CM उद्धव ठाकरे यांच्यात ‘चाय पे चर्चा’, भाजप विरोधी तिसऱ्या आघाडीचे संकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तेलंगणाचे मुख्यमंत्री (Telangana CM) के. चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांनी आज (रविवार) दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray) यांची मुंबईत भेट घेतली. सध्या के चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) हे तिसऱ्या आघाडीची (Third Front) स्थापना करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जातेय. केंद्रातल्या भाजप सरकारविरोधात (BJP Government) वेगवेगळ्या राजकीय पक्षांची मोट बांधण्याचे संकेत त्यांनी नुकतेच दिले होते. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार केसीआर (KCR) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

 

 

तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर या दोन प्रमुख नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना केसीआर म्हणाले की, ही तर फक्त सुरुवात आहे. आम्ही देशातील इतर नेत्यांशीही चर्चाच करणार आहोत, असं म्हणत केसीआर यांनी देशात भाजपविरुद्ध तिसऱ्या आघाडीची मोर्चे बांधणी करणार असल्याचे थेट संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर केसीआर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत.

 

ममतांचीही भेट घेणार
राव यांनी यापूर्वीच 20 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. तसेच त्यांची भेट घेण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हैदराबादला (Hyderabad) येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले होते. ममता बॅनर्जी यांनी मला फोन करुन बंगलमध्ये येण्याचे आमंत्रण दिले होते. अथवा आपण हैदराबादला येऊ असे सांगीतले. त्यांनी मला डोसा खावू घाला, अशी विनंती केली. मी त्यांचे कधीही स्वागत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्या लवकरच हैदराबदला येऊ शकतात. (K Chandrasekar Rao)

भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर
भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agency) गैरवापर केला जात आहे. या गोष्टीचा मी निषेध करतो. केंद्र सरकारने (Central Government) आपलं धोरण बदलायला पाहिजे. असे केले नाही तर पुढे जाऊन त्यांना हे सर्व भोगावे लागणार आहे.

 

सध्याची परिस्थिती घातक
2019 च्या निवडणुकीपूर्वी अनेक विरोधी नेते आणि मुख्यमंत्र्यांना भेटलोय. मात्र भाजप पुन्हा सत्तेत आल्याने अनेक गोष्टी बदलल्यात.
सध्याची परिस्थिती देशासाठी घातक सिद्ध होतेय. ती दिवसेंदिवस चिघळतेय. त्यामुळे तिसरी आघाडी उभारु.
त्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल, परंतु या आघाडीचे नेतृत्व कोण करणार याचे ठोस उत्तर केसीआर यांनी दिले नाही.

 

 

 

Web Title :- K Chandrashekar Rao| kcr to meet uddhav thackeray telangana chief minister kcr to meet uddhav thackeray today emphasize the discussion of the third front

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bharatiya Mazdoor Sangh | असंघटित, कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघ रस्त्यावर उतरणार. संघाची पुणे जिल्हा अधिवेशनात घोषणा

 

Pimpri Corona Update | मोठा दिलासा ! पिंपरी चिंचवडमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या शंभरच्या आत, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 422 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी