‘या’ बड्या नेत्याला हवंय ‘उप पंतप्रधानपद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकांचे निकाल लागायला अजून खूप अवकाश असताना सत्ताधारी आणि विरोधक दोघेही बहुमताची आणि मित्रपक्षांची गणिते जुळवताना दिसून येत आहे. अशातच लोकसभा निवडणुकांनंतर भाजपला बहुमत मिळालं नाही तर विरोधी पक्षांच्या आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्यास तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी होकार दर्शवला आहे. त्याचवेळी त्यांनी सरकारमध्ये सहभागी झाल्यास मोठ्या पदाची मागणी देखील केली आहे. त्यांनी उपपंतप्रधानपदाची मागणी केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला १० दिवस शिल्ल्लक राहिले आहेत. जर या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले नाही तर विरोधी पक्षांचे म्हणजेच महाआघाडीचे सरकार सत्तेत येण्याची शक्यता आहे. यासाठी २१ मे रोजी विरोधी पक्षांची दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. काँग्रेसशी यासंदर्भात त्यांनी चर्चा केली असून महाआघाडीला समर्थन देण्यास त्यांनी होकार दिला असून त्या बदल्यात उपपंतप्रधानपदाची मागणी केली आहे. जर ते केंद्रात गेले तर त्यांचा मुलगा जगन्नाथ राव हा तेलंगणाच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होईल.

चंद्रशेखर राव यांच्या या मागणीवर आश्चर्य देखील व्यक्त करण्यात आहे, कारण आजपर्यंत ते कधीही राष्ट्रीय राजकारणात दिसलेले नाही. काँग्रेस सध्या सातत्याने राव यांच्या संपर्कात आहे.

दरम्यान, तेलंगणात लोकसभेच्या १७ जागा असून मागील लोकसभा निवडणुकीत १३ जागांवर टीआरएसने विजय मिळवला होता. यावेळी देखील १०-१५ जागा जिंकण्याचा त्यांचा विश्वास आहे.