चंद्रयान- 2 : ‘ऑर्बिटर’ अगदी उत्तम प्रकारे काम करतोय, ISRO प्रमुख के. सिवन

नवी दिली : वृत्तसंस्था – इस्रो प्रमुख के सिवन यांनी चंद्रयान २ बाबत एक महत्वाची माहिती जाहीर केली आहे. चंद्रयान २ चे ऑर्बिटर व्यवस्थित आहे सर्व भाग अगदी उत्तम काम करत आहेत. आम्हाला लँडरकडून कोणताही संदेश मिळाला नाही मात्र ऑर्बिटर अगदी उत्तम प्रकारे काम करत आहे.

सिवन यांनी सांगितले की, एक राष्ट्रीय स्तरावरील समिती विश्लेषण करत आहे की नेमके लँडरसोबत काय चुकीचे झाले. समितीने अहवाल दिल्यानंतर समिती भविष्यातील योजनांवर काम करू शकते यासाठी आवश्यक प्रक्रियांची आणि अनुमोदनाची गरज असते आम्ही सध्या त्यावर काम करत आहोत. असे सिवन यांनी सांगितले.

चांद्रयान २ च्या माध्यमातून सर्व जगाची नजर भारतावर होती. भारताने केलेल्या कामामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत होते मात्र महत्वाच्या टप्प्यात ही मोहीम असताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटला इस्रोचे वैज्ञानिक हा संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्याचा जोरदार प्रयत्न करत होते मात्र वेळ निघून गेल्याने त्यांनी आशा सोडल्या होत्या.

 

Visit : policenama.com